पुणे

गावातच प्रत्येक बुधवारी पशू सर्वचिकित्सा शिबिरे

CD

पुणे, ता. २३ : पशुपालकांच्या दारी दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने ‘डॉक्टर आपल्या गावी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात प्रत्येक बुधवारी पशू सर्वचिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती अमोल नलावडे यांनी दिली.
या शिबिरांमुळे पशुपालकांना त्यांच्या गावातच विविध पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. यामुळे पशुधनाच्या आरोग्य संवर्धनासाठी आवश्यक उपचार, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शासकीय योजनांचा लाभ मिळणे सोपे होणार आहे. पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त आणि संबंधित तालुक्याचे सहायक आयुक्त या शिबिरांना भेटी देऊन पशुपालकांना पशुधन व्यवस्थापन, रोग नियंत्रण, आधुनिक पशुपालन पद्धती, तसेच विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी व अनुदान योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

शिबिरांमध्ये मिळणारे प्रमुख उपचार व सेवा पशुधनासाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे उपचार व आरोग्य तपासणी, जनावरांची वंध्यत्व तपासणी आणि गर्भतपासणी, विविध आजारांवरील रोग प्रतिबंधक लसीकरण, जनावरांच्या आरोग्याला घातक ठरणारे गोचीड व गोमाश्यांचे निर्मूलन, पशुसंवर्धन विभागाच्या विविध कल्याणकारी व शासकीय अनुदान योजनांची थेट माहिती

ग्रामीण भागातील पशुपालकांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. गावातच सर्व सेवा मिळाल्यामुळे पशुपालकांचा वेळ व वाहतुकीचा खर्च वाचणार असून, पशुधनाचे आरोग्य, उत्पादनक्षमता आणि आर्थिक मूल्य वाढविण्यास मोठी मदत होईल.
- अमोल नलावडे, सभापती, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Water Pumping Ban : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! भोगावती आणि पंचगंगा नदीकाठावर 'या' दिवशी राहणार उपसाबंदी; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द

Dharashiv News: डोळ्यादेखत बस जळून खाक; चालकाच्या एका निर्णयाने वाचले १५ जीव!

Congress Organizational Reshuffle : काँग्रेसमध्ये संघटनात्मक मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चार नेत्यांना संधी; ८१ सचिवांच्या नियुक्त्या जाहीर

Latest Marathi News Live Update : चंद्रपूर-नागपूर महामार्गावर ट्रकला भीषण आग, वरोरा येथे पहाटेच्या सुमारास घटना

IND vs NZ 1st Test Day 2 Live: अम्पायरचा डोळा लागला अन् लोकेश राहुल वाचला; न्यूझीलंडच्या ताफ्यात गोंधळाचे वातावरण, दुसऱ्या सत्रात नाट्यमय घडामोड

SCROLL FOR NEXT