Dr Ramakrishnan Raman sakal
पुणे

Pune News : सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. रामकृष्णन रमण

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. रामकृष्णन रमण यांची निवड करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. रामकृष्णन रमण यांची निवड करण्यात आली आहे. शिक्षणतज्ञ, अनुभवी व्यावसायिक असणारे डॉ. रमण यांनी संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमधील पदवी, सिस्टिम्स आणि मार्केटिंगमधील एमबीए, पुणे विद्यापीठातून व्यवस्थापनातील डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे.

डॉ. रमण यांनी कुलगुरू पदावरून निवृत्त झालेल्या डॉ. रजनी गुप्ते यांच्याकडून नुकताच पदभार स्वीकारला. डॉ. रमण यांना औद्योगिक, शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात दोन दशकांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सिंबायोसिस सेंटर फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक आणि संचालक, सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे (पुणे) प्राध्यापक आणि संचालक, व्यवस्थापनाचे अधिष्ठाता, स्ट्रॅटेजी अँड डेव्हलपमेंटचे संचालक अशा विविध पदांवर त्यांनी एक दशकाहून अधिक काळ काम केले आहे.

जपान, कॅनडा, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स या देशांमधील विद्यापीठांसमवेत आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. माहिती प्रणाली, आयटी स्ट्रॅटेजी, उद्योजकता, एआय, बिग डेटा यांमधील संशोधनामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय शैक्षणिक क्षेत्रात मान्यता मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 1st ODI: भारताने मारले रांचीचे मैदान, द. आफ्रिकेला दिली मात; कोहलीच्या शतकानंतर कुलदीप यादव-हर्षित राणा चमकले

Eknath Shinde: ठाण्यातील 'या' शहराला 'टेम्पल सिटी' बनवणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन, काय म्हणाले?

Lonavala Car Fire : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर धावत्या मोटारीला अचानक आग; चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली!

Hinjewadi News : यापुढे अपघात झाला, तर मालकच जबाबदार; ‘आरएमसी’ मालक-चालकांना हिंजवडी पोलिसांची कठोर शब्दांत समज!

IND vs SA, 1st ODI: विराट कोहलीने शतक करताच रोहितने दिली शिवी? गौतम गंभीरची कशी होती रिऍक्शन? पाहा Video

SCROLL FOR NEXT