pune.jpg
pune.jpg 
पुणे

विश्वानाथ स्पोर्टस्‌ मीट २०१९' मध्ये एमआयटी मॅनेट संघाचा विजय

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर  : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयडी आर्ट, डिझाईन आणि टेक्नालॉजी विद्यापीठाच्यावतीने राजबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या 'विश्वानाथ स्पोर्टस्‌ मीट २०१९' या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये एमआयटी - एडीटी विद्यापीठीतील एमआयटी महाराष्ट्र अकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अॅण्ड ट्रेनिंग (मॅनेट) संघाने सर्वाधिक ८ सुवर्ण आणि ११ रौप्य पदक जिंकत सर्वसाधारण जेतेपदावर आपले नाव कोरले. 

तर कोथरूड येथील एमआयटीच्या संघाने ६ सुवर्ण आणि २ रौप्य पदकासह दुसरा क्रमांक, व लोणी काळभोर येथील एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (आयओडी) संघाला ५ सुवर्ण पदक आणि ८ रौप्य पदकासह तिसरा क्रमांकांचे बक्षिस मिळाले. पुणे येथील सर परशुराम कॉलेज या संघाने ५ सुवर्ण, तर २ रौप्य पदक जिंकत चौथ्या क्रमांक पटकावला. 

विजेत्या संघाला आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंगचे ब्रिगेडियर रवींद्र एस नायडू, ट्रनिंग ऑफिसर आर्मी स्पोर्टस्‌ इन्स्टिट्यूटचे लेफ्टं कर्नल धारासिंग चहल, ऑलिंम्पियन सुभेदार बसंत बहादूर राणा, एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या (मिटकॉम) संचालिका प्रा. सुनीता कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलसचिव शिवशरण माळी, डॉ. महेश देशपांडे, विश्वनाथ स्पोर्टस्‌ मीट २०१९ च्या नियोजन समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. आशिष पानट, विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड आदी उपस्थित होते. 

गरवारे कॉलेजचा मिहिरी आंब्रे याला जलतरणमध्ये सर्वात्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला. तर महिलांच्या जलतरण स्पर्धेत प्रांजल तथाडे आणि रुपल बुजाडे यांनी सर्वात्कृष्ट खेळाडू पुरस्काराने गौरविण्यात आले. रोईंगमध्ये परमिंदर सिंग याला सर्वात्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला. 


'विश्वानाथ स्पोर्टस्‌ मीट २०१९' अंतिम निकाल 
कॉलेजचे नाव  - (सुवर्ण---रौप्य यांची संख्या)  
एमआयटी मॅनेट (८---११)
एमआयटी कोथरूड (६---२) 
एमआयटी आयओडी (५---८)
एसपी कॉलेज (५---२) 
एमआयटी डब्ल्यूपीयू (४---१), 
गरवारे कॉलेज (३---१)
नेस वाडिया कॉलेज(३---१)
अनंतराव पवार कॉलेज(३---०)
 सीओईपी (३---२)
 डॉ. डी वाय पाटील कॉलेज (२---१) 
आबासाहेब कॉलेज (२---१),
पी. जोग कॉलेज (२---१), 
व्हीआयआयटी कोंडवा (१---३), 
बीजेएस कॉलेज (२---१), 
भारती विद्यापीठ (१---०)
 एसएम शेट्टी कॉलेज मुंबई (१---०) 
एआयटी दिघी (०---३)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT