Gram Panchayat Election Results Esakal
पुणे

Gram Panchayat Election Results: काटेवाडी अजित पवारांचीच, घरच्या मैदानात भाजपला दाखवले आस्मान

काटेवाडीचा गड राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने राखला

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत गेल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फुट पडली. पक्षात दोन गट निर्माण झाले. या सगळ्या घडामोडीनंतर राज्यात पहिल्यांदाच निवडणूक पार पडली आहे. संपुर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामतीतील निकाल समोर आले आहेत. राज्याचा राज्यकारभार सोबत चालवत असणाऱ्या अजित पवार गटाची आणि भाजपची ही एकमेकाविरोधात चुरशीची लढत यावेळी दिसून आली. त्यामुळे संपुर्ण राज्याचं लक्ष त्याकडे लागलं होतं.

अजित पवारांचं गाव असलेल्या काटेवाडीमध्ये भाजप की, राष्ट्रवादी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काटेवाडी गावात भाजप विरूध्द राष्ट्रवादी अशी चुरशीची लढत पार पडली. यामध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. राष्ट्रवादीने आपली एकहाती सत्ता कायम ठेवली आहे. १६ पैकी १४ जागा अजित पवार गटाच्या पॅनलने जिंकल्या आहेत. तर उर्वरीत २ जागा भाजपच्या पॅनलने जिंकल्या आहेत.

अजित पवार यांचं बारामतीत वर्चस्व पाहायला मिळालं. अजित पवार गटाने ३१ पैकी २९ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.

काटेवाडीचा गड राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने राखला. अजित पवार गट पुरस्कृत जय भवानी माता पॅनलचा काटेवाडीतून विजय झाला आहे. काटेवाडी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं गाव आहे. काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अजित पवार गटाच्या पॅनल पुढे भाजपाचा पॅनल उभा ठाकला होता. यामुळे संपुर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं.

बारामती तालुक्यातील 32 ग्रामपंचायत निवडणूक आहेत. यातील एक बिनविरोध झाल्यामुळे ३१ ग्रामपंचायतीसाठी काल मतदान झालं होतं. महायुतीत असूनही अजित पवार गट आणि भाजपने एकमेकांविरोधात पॅनेल उभी केल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष होतं. बारामती तालुक्यातील मध्ये २९ ग्रामपंचायती अजित पवार गटाकडे तर २ भाजपकडे गेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

'म्हातारपणात स्वतःची माती कशाला...' प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'हे करण्यापेक्षा चारधाम यात्रा...'

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

SCROLL FOR NEXT