Maratha Reservation  Sakal
पुणे

Maratha Reservation : मंचर शहरात जल्लोष; मराठा समाज बांधवांकडून लाडू वाटप, फटाक्यांची आतषबाजी

मंचर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधवांनी एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय आदी घोषणा देऊन जल्लोष साजरा केला. यावेळी उपस्थितांना लाडूचे वाटप करण्यात आले.

डी.के वळसे पाटील

Manchar News : मंचर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधवांनी एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय आदी घोषणा देऊन जल्लोष साजरा केला. यावेळी उपस्थितांना लाडूचे वाटप करण्यात आले.फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मागील अनेक महिन्यांपासून लढा उभारला होता. आंबेगाव तालुक्यात राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड.सुनिल बांगर, आंबेगाव तालुका मराठा आरक्षण आंदोलन समितीचे समन्वयक वसंतराव बाणखेले,

मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अंकुश लांडे पाटील, माजी सरपंच दत्ता गांजाळे, उद्योजक अजय घुले यांच्या नेतृत्वाखाली अनेकदा आंदोलन, उपोषण करण्यात आले होते.

शनिवारी (ता.२७) राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून याबाबत अध्यादेशही काढण्यात आला आहे. ही घोषणा राज्य शासनाने केल्यानंतर मराठा समाज बांधवांनी जल्लोष केला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले, राजाराम बाणखेले, वसंतराव बाणखेले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी आशिष घोलप, माजी सरपंच मिरा बाणखेले,

अश्विनी शेटे, संगिता बाणखेले, प्रवीण मोरडे, परशुराम भेके,संदीप बाणखेले, संदीप जुंदरे, संदीप निघोट, गणेश खानदेशे, कुणाल बाणखेले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसंतराव बाणखेले यांची यावेळी मिरवणूक काढण्यात आली.

“समाज बांधवानी एकजूट दाखवून दिलेल्या पाठींब्यामुळेच मराठा आरक्षण मिळाले आहे.यापुढेही समाज बांधवानी एकजूट कायम ठेवावी.”असे आवाहन वसंतराव बाणखेले यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT