पुणे

उष्णतेच्या लाटेचा विदर्भाला चटका अकोला व वर्धा @ ४६, पंखे व कुलरही प्रभावहीन

CD

सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. १७ : उन्हाचे सर्वाधिक चटके देणारा नवतपा अजून आठ दिवसांवर असला तरी सध्याही सूर्याचा प्रकोप चांगलाच जाणवत आहे. विदर्भात रविवारीही उष्णतेचा भडका होता. अकोला व वर्ध्याचे कमाल तापमान पुन्हा ४६ अंशांवर गेले, तर उपराजधानीच्या पाऱ्यानेही जोरदार उसळी घेतली. उष्णलाटेने वैदर्भीय हैराण असून, दुपारच्या सुमारास शहरातील रस्त्यांवर अक्षरशः शुकशुकाट दिसून येत आहे. मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी पारा ४२ पर्यंत गेला आहे.
उन्हाच्या तडाख्यामुळे विदर्भातील जनजीवन विस्कळीत झाले असून एरव्ही दुपारच्या वेळी असणारी वर्दळ दिसेनाशी झाली आहे. उन्हाच्या या तडाख्यापुढे पंखे व कुलरही प्रभावहीन ठरत आहेत. दिवसाच नव्हे, सायंकाळी व रात्रीही गरमी व उकाडा जाणवत आहे.

आणखी चार दिवस ‘यलो अलर्ट’
प्रादेशिक हवामान विभागाने आणखी चार-पाच दिवस संपूर्ण विदर्भात उष्णलाटेचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर लवकरच नवतपा सुरू होत आहे. सध्याचे एकूणच वातावरण लक्षात घेता मे महिन्याचा उत्तरार्ध वैदर्भीयांची चांगलीच अग्निपरीक्षा घेणार आहे.
........
विदर्भातील कमाल तापमान
शहर तापमान
अकोला ४६.०
वर्धा ४६.०
अमरावती ४५.८
नागपूर ४४.४

सोलापूर ४४ अंशांवर
यंदाच्या हंगामात सोलापूरच्या तापमानाने रविवारी आतापर्यंतचा उच्चांक गाठला. येथे आज कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. दिवसभर तापलेली जमीन रात्रीही थंड होत नसल्याने नागरिक घामाघूम झाले आहेत. हवामान तज्ज्ञांच्या विश्लेषणानुसार, मे महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात पारा ४४.५ ते ४५.५ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खुल्या जागेत कुर्बानी होऊ देणार नाही; धर्माच्या नावाखाली कत्तल सहन करणार नाही, बकरीदपूर्वी भाजप नेत्याचे BMC ला पत्र

Retired Teacher Donation: सेवानिवृत्त शिक्षिकेची एक कोटींची देणगी; विजयाताई वैद्यांचा सैनिकांच्या कल्याणासाठी प्रेरणादायी त्याग

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT