AIMIM.gif 
पुणे

Vidhan Sabha 2019 : विधानसभेची पुण्यातील पहिली उमेदवारी जाहीर 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात एमआयएमने आघाडी घेतली आहे. त्यानुसार पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातून डॅनिअल लांडगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. लांडगे हे आगामी विधानसभा निवडणुकीतील पुणे शहरातील पहिले अधिकृत उमेदवार ठरले आहेत. 

डॅनिअल लांडगे हे पुणे महापालिकेतील एमआयएमच्या एकमेव नगरसेविका अश्‍विनी लांडगे यांचे पती आहेत. या उमेदवारीच्या माध्यमातून एमआयएमने पुण्यातील मुस्लिम, दलित आणि ख्रिश्‍चन मतांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा येरवडा परिसरातील सामाजिक कार्यात मोठा सहभाग असून पत्नी नगरसेविका असल्याने त्याचाही फायदा त्यांना होणार आहे. 

वंचित बहुजन आघाडीसोबत काडीमोड घेतल्यानंतर एमआयएमने राज्यातील विधानसभा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी मंगळवारी एमआयएमच्या राज्यातील चार उमेदवारांची यादी जाहीर केली. या पक्षाची उमेदवारी जाहीर झालेल्यांमध्ये लांडगे यांच्यासह मोहंमद फिरोज लाला (नांदेड उत्तर), मुफ्ती महंमद इस्माईल अब्दुल खालिक (मालेगाव मध्य) आदींसह चार जणांचा समावेश आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याची शेतकऱ्यांना मोठी भेट! पहिली उचल प्रतिटन ३,९५१ रुपये; पुणे जिल्ह्यात सर्वाधिक

Dhule Mayor Mayadevi Pardeshi : राजकारणात खळबळ ! भाजपच्या महापौरांचा विष प्राशन करुन जीवन संपविण्याचा प्रयत्न; आमदारांचा धक्कादायक खुलासा

Land Acquisition: राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी कोंढापुरी ग्रामस्थांचे खासदारांना साकडे

Marathi News Live Updates : कोंढव्यातील भाग्योदय नगर येथील इमारतीत 18 वाहनांना आग

Satara Teachers News: साताऱ्यात शिक्षकांवर प्रशासनाचा दणका! नऊ जण निलंबित, १३ जणांना बडतर्फीची नोटीस, धक्कादायक कराण आले समाेर?

SCROLL FOR NEXT