पुणे

Vidhan Sabha 2019 : पहिल्या दिवशी दोनच उमेदवारी अर्ज

सकाळ वृत्तसेवा

पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातून शुक्रवारी दोघांनीच उमेदवारी अर्ज दाखल केले. वडगाव शेरी आणि इंदापूर येथून प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला. निवडणुकीसाठी शुक्रवारपासून (ता. २७) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. २१ विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले. 

येथे दाखल करा उमेदवारी अर्ज
कसबा - गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट. वडगाव शेरी - येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालय, दुसरा मजला, येरवडा. शिवाजीनगर - पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रस्ता. कोथरूड - जुना कर्वे रस्ता क्षेत्रीय कार्यालय, कर्वे रस्ता. खडकवासला - तहसील कार्यालय, हवेली, शुक्रवार पेठ, खडकमाळ.पर्वती - स्पोर्टस्‌ आर्ट गॅलरी इमारत, पहिला मजला, बाबूराव सणस मैदान.हडपसर - आर. आर. शिंदे ज्युनिअर कॉलेज, साधना विद्यालय, हडपसर.पुणे कॅंटोन्मेंट - उपअभियंता कार्यालय, सार्वजनिक बांधकाम, कॅम्प. चिंचवड - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी. पिंपरी - डॉ. हेडगेवार भवन, निगडी प्राधिकरण, पिंपरी. भोसरी - अण्णासाहेब मगर स्टेडियम समोर, नेहरूनगर, पिंपरी.

प्रशिक्षण केंद्रात बदल
मतदान केंद्राध्यक्षासह अधिकाऱ्यांसाठी पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात २८ आणि २९ सप्टेंबर रोजी प्रशिक्षण शिबिर होणार होते; परंतु अतिवृष्टीमुळे पद्मावती येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल येथे प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती निवडणूक शाखेने दिली.

तक्रारनिवारण कक्ष स्थापन
निवडणुकीच्या तक्रारींवर कार्यवाहीसाठी जिल्हास्तरावर २४ बाय ७ तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. तेथे कोणालाही खालील दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदविता येईल.  ०२०- २६१२१२३१ 
 ०२०- २६१२१२९१  ०२०- २६१२१२७१  ०२०- २६१२१२८१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

GT vs KKR Live : कॅमेरून ग्रीनला सूर गवसला, ११ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; पण, कोलकाताने २६ धावांत ५ विकेट्स गमावल्या अन्...

GT vs KKR Live: कॅमेरून ग्रीनचा 'माँस्टर' Six! महागड्या Sierra गाडीला डेंट... TATA देणार ५ लाख, जाणून घ्या नेमकं प्रकरण, Video

Women Reservation Bill : "भारतानं पाहिलं, इंडिया आघाडीनं रोखलं," महिला आरक्षण नामंजूर होताच राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

TCS Layoffs Update: वादाच्या भोवऱ्यात असतानाही TCSचा मोठा निर्णय; Layoffs थांबवले आणि कर्मचाऱ्यांना दिली सुरक्षित नोकरीची हमी

SCROLL FOR NEXT