tree cutting for Narendra modi rally in SP college 
पुणे

Vidhan Sabha 2019 : पुण्यात मोदींच्या सभेसाठी 'सप'मधील झाडे सपासप कापली

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी स. प. महाविद्यालयाच्या मैदानातील सुमारे २० ते २५ झाडे कापली आहेत. येत्या गुरुवारी मोदी यांची सभा स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. मैदानात समोरच्या बाजूला व्यासपीठ उभारण्याचे काम सुरू आहे. व्यासपीठ उभारण्यात अडथळा येत असल्यामुळे ही झाडे तोडण्यात आल्याचे समोर आले. काही झाडे निम्म्यापर्यंत तोडली आहेत, तर काही झाडांचा केवळ बुंधा शिल्लक आहे. तर काही झाडे पूर्णपणे कापण्यात आली आहेत. अशी वीस ते पंचवीस झाडे तोडण्यात आली आहेत. १४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनादेश यात्रा पुण्यात आली होती. या यात्रेच्या निमित्ताने सिंहगड रस्त्यावरील झाडे तोडण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनीही यांची गंभीर दखल घेऊन कारवाई करू, असे आश्‍वासन दिले होते. मात्र त्याचे पुढे काय झाले हे अद्याप गुलदस्तातच आहे. 

याबाबत शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन म्हणाले, ‘‘व्यासपीठाजवळ सोळा झाडे होती. त्यातील बहुतेक झाडे बाभळीची होती. महापालिकेची परवानगी घेऊन ती कापण्यात आली आहेत. दोन झाडे तशीच आहेत. एक झाड पावसामुळे पडले आहे. यात काहीही चुकीचे नाही.’’

झाडांचा बळी कशासाठी?
नेत्यांच्या दौऱ्यासाठी महिन्यात दुसऱ्यांदा झाडांवर कुऱ्हाड चालविली जात आहे. यावरील आपले मत अवश्‍य कळवा. 

फेसबुक आणि ट्विटरवर #ModiRally हॅशटॅग वापरून आम्हाला कळवा किंवा webeditor@esakal.com  वर ई-मेल करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT