पुणे

Vidhan Sabha 2019 : आघाडीचे पुण्यातील जागावाटप निश्‍चित; राष्ट्रवादीला चार, तर काँग्रेसला तीन

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 
पुणे - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागावाटपात पर्वती, हडपसर, वडगाव शेरी आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ ‘राष्ट्रवादी’कडे असल्याची घोषणा पक्षाचे नेते अजित पवार यांनी रविवारी पुण्यात केली.  शिवाजीनगर, कसबा, पुणे कॅंटोमेंट काँग्रेस; तर कोथरूडची जागा मित्रपक्षाला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुढच्या आठवडाभरात उमेदवार जाहीर करू, असे सांगत पवार यांनी प्रचाराचा नारळ फोडला. दरम्यान, ज्या जागांवर काँग्रेसचे उमेदवार असतील, ते आपल्याच पक्षाचे असल्याने प्रचार करा, हेही पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. 

शहरातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी प्रत्येकी चार मिळविण्यासाठी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचा प्रयत्न होता. त्यात पर्वती मतदारसंघावर दोन्ही पक्षांनी दावा केला होता. त्यामुळे आघाडीच्या जागावाटपाची चर्चा लांबणीवर पडली होती. मात्र, ‘राष्ट्रवादी’कडील मतदारसंघ पवार यांनीच जाहीर केल्याने जागांचा तिढा सुटल्याचे मानले जात आहे.  निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांचा मेळावा पवार यांच्या उपस्थितीत झाला. तेव्हा त्यांनी पुण्यातील आठपैकी चार मतदारसंघ ‘राष्ट्रवादी’कडे असल्याचे स्पष्ट केले. कोथरूडची जागा मित्रपक्षाला जाण्याची शक्‍यताही पवार यांनी वर्तविली. या शक्‍यतेमुळे कोथरूडसाठी मित्रपक्ष कोण असेल, याची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत मनसेला एकत्र घेऊन त्यांना ही जागा सोडली जाण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT