पारगाव, ता. १९ : अवसरी बुद्रूक (ता. आंबेगाव) येथील विद्या विकास मंदिर विद्यालयाच्या १९९२-९३ दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आणि शिक्षकांच्या नावे वृक्षारोपण करून एक नवा आदर्श निर्माण केला. स्नेहमेळाव्याचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला.
आरोग्यमंत्र्यांचे खाजगी सचिव डॉ. मंगेश शिंदे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या वेळी माजी प्राचार्य विष्णू हिंगे, जगन्नाथ सुपेकर, अंकुश शिंगाडे, चंद्रकांत शेवाळे, दत्तात्रेय अभंग, अर्चना चव्हाण, सुवर्णा रोकडे व ज्ञानेश्वर येलभर उपस्थित होते. या विद्यार्थ्यांनी केवळ वृक्षारोपणच केले नाही, तर वर्षभर या रोपांची निगा राखण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे.
उद्योजक प्रमोद हिंगे यांनी रोपांचा पुरवठा केला, तर विद्यार्थ्यांनी संरक्षक जाळ्यांची व्यवस्था केली. उपसरपंच अनिल हिंगे यांनी वर्षभर देखभालीची जबाबदारी घेतली. या प्रसंगी अजित हिंगे यांनी स्नेहभोजनाचे नियोजन केले. सरपंच सारिका हिंगे, अजित चव्हाण, संजय चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य सुरेश जारकड व दिनेश टाव्हरे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.