Administrator on Maharashtra State Co-operative Bank Vidyadhar Anaskar felicitated by Pawar sakal
पुणे

विश्वासार्हतेमुळेच विद्याधर अनास्कर राज्य बॅंकेवर : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अनास्कर यांचे कौतुक

अनिल सावळे- सकाळ विशेष

पुणे : ‘‘राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते त्यावेळी विद्याधर अनास्कर हे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेवर प्रशासक होते. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी तेच प्रशासक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. एवढी विश्वासार्हता एखाद्या व्यक्तीवर असली पाहिजे,’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनास्कर यांचे कौतुक केले.

अनास्कर यांची राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली. यानिमित्त पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरात उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात अनास्कर यांनी ‘राजकारणात सहकार असला पाहिजे, परंतु सहकारात राजकारण नको’, अशी भूमिका मांडली. हाच धागा पकडत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘राज्य सहकारी बॅंक चुकीच्या पद्धतीने चालली आहे, त्याठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचे वातावरण विरोधकांकडून तयार करण्यात आले. साखर कारखाने कमी दराने लिलाव करण्यात आल्याचे आरोप झाले. या संदर्भात सहकार विभाग, सीआयडी, सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी झाली. परंतु त्यात काहीही तथ्य आढळले नाही.’’

राज्य सरकारने राज्य बॅंकेचे प्रशासक म्हणून अनास्कर यांना नेमले आहे. वास्तविक राज्य बॅंकेची निवडणूक आम्ही लावू शकतो. परंतु ३१ मार्चअखेर राज्य बॅंकेला चौदाशे कोटींचा ढोबळ नफा आणि सहाशे कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. राज्य बॅंकेत अनास्कर यांनी बारकाईने लक्ष घातले आहे, असे त्यांनी नमूद केले.

‘‘राजकारणात सहकार असला पाहिजे, परंतु सहकारात राजकारण नको, हे अनास्कर यांनी बरोबर उचलले आहे. कोणाचेही सरकार असले तरी राज्य बॅंकेवर ते चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. कधी आमच्याकडे कर्जाच्या मागणीसाठी शिष्टमंडळ येतात. परंतु कर्ज देताना रिझर्व्ह बॅंक, सहकार विभाग, नाबार्डचे काय निकष आहेत, हे तपासावे लागतात. कारण उद्या पुन्हा काय घडले तर कायदे किती कठोर आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. मी राज्य बॅंकेचे एखादे काम सांगितले आणि ते योग्य नसेल तरी माझेही ऐकायचे नाही, असे मी अनास्कर यांना सांगितले आहे,’’ असे सांगत पवार यांनी अनास्कर यांच्यावर दृढ विश्वास व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चार वर्षांनी त्याच मैदानावर परतणार भुवनेश्वर कुमार! जिथे टी-२० पदार्पणात घेतल्या होत्या ३ विकेट्स, तिथेच आता मालिकेचा निर्णायक सामना

Crispy Sweet Potato Fries Chaat: गोड दही, चटपटीत चटणी अन् कुरकुरीत फ्राइज; असा बनवा उपवासासाठी खास रताळ्याचा चाट!

लालकृष्ण अडवाणींची प्रकृती बिघडली, अपोलो रुग्णालयात केलं दाखल; उपचार सुरू

CJP Protest: भारतातील आंदोलनांना खरंच अमेरिकेतून फंडिंग? प्रसिद्ध गायिकेने थेट उद्योगपतीचं नाव घेत केला आरोप

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत भाविकांना लुटणाऱ्या टोळीकडून २१ लाखांचे दागिने जप्त; उत्तर प्रदेशातील टोळीवर फरासखाना पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT