पुणे

‘विद्यापूर्णा’ शिष्यवृत्तीतून ६०० विद्यार्थ्यांना मदतीचा हात

CD

पुणे, ता. २५ : अन्नपूर्णा परिवारातर्फे राबविण्यात येणारा ‘विद्यापूर्णा’ शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रकल्प गेली २४ वर्षे एकल माता आणि गरजू कुटुंबांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करत आहे. पैशाअभावी मुलांचे शिक्षण थांबू नये, या उद्देशाने सन २००२मध्ये डॉ. मेधा पुरव-सामंत यांनी या उपक्रमाची सुरुवात केली.
या योजनेअंतर्गत बालवाडी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी तीन हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. शाळेची फी, पुस्तके, वह्या, गणवेश आणि इतर शैक्षणिक खर्चासाठी ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. यंदा जून महिन्यात ६०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली असून, जुलैमध्ये आणखी ४०० विद्यार्थ्यांना मदत दिली जाणार आहे. अन्नपूर्णा महिला पतसंस्था, तसेच वैयक्तिक आणि कॉर्पोरेट देणगीदारांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असून, अनेक गरजू मुलांच्या शिक्षणाला आधार मिळत आहे.

29708

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रेस्टॉरंटमध्ये जाणाऱ्यांसाठी मोठी माहिती! बाहेरचं खाणं किती सुरक्षित? धक्कादायक अहवाल समोर, जेवायला जाण्याआधी 'ही' बातमी वाचाच

"मला फरक पडत नाही तो १५ चा आहे की १८...", Vaibhav Sooryavanshi बद्दल ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली नेमकं काय म्हणाला?

Scholarship Exam Result : चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्तीचा अंतिम निकाल जाहीर

Marathi News Live Updates : कोलंबियात जोरदार भूकंपाचे धक्के, तीव्रता ७.४ रिश्टर स्केल

Tiranga Rally : 'तिरंगा रॅली’ निमित्त डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल

SCROLL FOR NEXT