Vighnahar factory aims crush 11 lakh metric tonnes of sugarcane in 2022-23 season junnar sakal
पुणे

येत्या हंगामात विघ्नहर कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

हिरवळीचे खत म्हणून ताग बियाणाचेही वाटप सुरु असून ऊस उत्पादकांनी अवश्य फायदा घ्यावा, असे आवाहन शेरकर यांनी केले.

दत्ता म्हसकर

जुन्नर : येथील श्री विघ्नहर सहकारी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आगामी गाळपासाठी मोठ्या प्रमाणावर ऊस उपलब्ध होणार असल्याने येत्या हंगामात सुमारे अकरा लाख मेट्रिक टनाहुन अधिक ऊस गाळपाचे उद्दिष्ठ राहणार असल्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सांगितले. श्री विघ्नहर साखर कारखान्याच्या २०२२-२३ च्या गाळप हंगामासाठी मील रोलरचे पुजन आज शुक्रवार ता.०८ रोजी सर्व संचालकांच्या उपस्थितीत उत्साहात  संपन्न  झाले यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप, सर्व संचालक, कार्यकारी संचालक भास्कर घुले व सर्व अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी शेरकर म्हणाले, आगामी गाळप हंगामासाठी मशिनरी देखभाल व दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून येत्या ऑक्टोबर महिन्यात विघ्नहर कारखाना गाळपासाठी सज्ज होईल. सहवीजनिर्मीती व डिस्टीलरी प्रकल्पांची कामे गतीने सुरु आहेत. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने शेतकरी वर्गाचा ऊस लागवडीकडे कल आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांना बेणे पुरविण्याची प्रक्रिया सुरु आहे. आडसाली ऊस लागवडीकडे शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणावर कल असल्याचे दिसत आहे. शेतकर्‍यांनी आडसाली ऊसाबरोबर पूर्वहंगामी व सुरु ऊसाची लागवडही मोठ्या प्रमाणात करावी त्यामुळे ऊस तोडणी नियोजन योग्यप्रकारे करता येईल. हिरवळीचे खत म्हणून ताग बियाणाचेही वाटप सुरु असून ऊस उत्पादकांनी अवश्य फायदा घ्यावा, असे आवाहन शेरकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT