विजय चौधरी यांना चार दिवसांची कोठडी नंदुरबार : कथित ऑडीओ क्लिपप्रकरणात गुरूवारी रात्री अटक झाल्यानंतर भाजपाचे तत्कालीन उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांना पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने चौधरी यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सोशल मिडिीयावर कथित ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. या प्रकरणात भाजपाचे विजय चौधरी यांच्यावर नंदुरबार शहर पोलिसात दोन आणि अक्कलकुवा पोलिसात एक असे ॲट्रासिटीचे एकुण तीन गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने श्री. चौधरी यांना गुरूवारी रात्री धुळे येथून ताब्यात घेतले होते. नंदुरबारात आणल्यानंतर त्यांच्यावर मध्यरात्रीनंतर १२.४५ वाजता अटकेची कारवाई करण्यात आली. पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने विजय चौधरी यांना सोमवार दि.१० ऑगष्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सदर प्रकरणातील उपलब्ध पुरावे, ऑडिओ क्लिप व इतर संबंधित बाबींची तपासणी पोलिसांमाफॅत करण्यात येत आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड हे करीत आहेत. काय आहे प्रकरण कथित ऑडीओ क्लिप प्रकरणात माजी आमदार डॉ. विजयकुमार गावित तसेच माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबाबत अपमानास्पद भाषेचा वापर करून जातीवाचक शब्दप्रयोग करण्यात आल्याचे पोलिसात दाखल फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. नंदुरबार शहर पोलिसात विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोट--- कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच जातीय तेढ निर्माण करणाऱ्या किंवा समाजातील शांतताभंग करणाऱ्या कृत्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येत आहे. कथित ऑडीओ क्लिपप्रकरणात दाखल असलेल्या ॲट्रासिटीच्या एकुण तीन गुन्ह्यात विजय चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आवश्यक ती कायदेशिर कारवाईची प्रक्रीया केली आहे. त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच कोणी अफवा पसरवू नयेत. - अश्विनी सानप, जिल्हा पोलिस अधिक्षक नंदुरबार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.