पुणे

विजय जाधव यांचे सोलापूरच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार

CD

विजय जाधव यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार

श्रद्धांजली सभेत मान्यवरांची भावना; अपघातस्थळी गतिरोधक व रस्त्याला जाधव यांचे नाव देण्याची मागणी

सोलापूर, ता. २१ : सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने झटणारे दिवंगत विजय जाधव यांच्या अपघाती निधनाने विविध सामाजिक क्षेत्रांत हळहळ व्यक्त होत आहे. शहराला विकासात पुढे नेण्याची जाधव यांची भूमिका होती. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार सोमवारी (ता. २१) रंगभवन येथील समाजकल्याण केंद्रात आयोजित श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आला.
सोलापूर विकास मंचची वैचारिक व बौद्धिक हानी जाधव यांच्या निधनामुळे झाली असून, त्यांच्या विचारांची दिशा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सोलापूरच्या विकासाच्या प्रश्नांवर जाधव यांनी सातत्याने आवाज उठविला. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन विकासासाठी कायमस्वरूपी प्रयत्न करण्याचे आवाहनही करण्यात आले. ज्या रस्त्यावर जाधव यांचा अपघात झाला, त्या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावा, भविष्यातील अपघात टाळण्यासाठी या रस्त्याची सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली. या रस्त्याला दिवंगत विजय जाधव यांचे नाव देण्यात यावे, तसेच त्यांच्या अपघाताची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही उपस्थितांनी केली. श्रद्धांजली सभेस विजय जाधव यांच्या कुटुंबीयांसह मिलिंद भोसले, शिवरत्न शेटे, जयश्री तासगावकर, गौरी आंबेकर, सुधा पाटील, शैलेंद्र क्षीरसागर, मनोज क्षीरसागर, सुहास भोसले, योगीन गुर्जर, केतन शहा, नरसिंग मेंगजी, डॉ. दिलीप बोर्डे, डॉ. संदीप आडके, ॲड. राजन दीक्षित आदी उपस्थित होते.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

Kaygaon News : शेतकरी पुत्राची गरुड भरारी, धनगरपट्टीच्या शुभम खैरेची नगरपरिषद अधिकारीपदी निवड

Pune Ganeshotsav : दोन वर्षांपासून सहभागी मंडळांनाच यंदा मिरवणुकीत प्रवेश; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

SCROLL FOR NEXT