प्रभाकरनच्या स्मरणाने
विजय वादाच्या भोवऱ्यात
चेन्नई, ता. १९ (वृत्तसंस्था) : तमिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री आणि ‘टीव्हीके’चे प्रमुख जोसेफ विजय यांनी श्रीलंकेतील तमीळ नागरिकांच्या नरसंहाराचा उल्लेख करताना, ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम’चा (एलटीटीई) म्होरक्या व्ही. प्रभाकरनचेही स्मरण केले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
‘एलटीटीई’ने अनेक दशके स्वतंत्र तमीळ ईलमसाठी श्रीलंकेच्या सरकारविरुद्ध बंड पुकारले होते. २६ वर्षांच्या या संघर्षात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. श्रीलंकेच्या लष्कराने १८ मे २००९ रोजी प्रभाकरनला ठार मारले होते. त्याच्या स्मरणार्थ ‘एक्स’वर पोस्ट करत विजय यांनी या संघर्षाचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले आहे, की ‘मुलीवैक्कल नरसंहाराच्या आठवणी आमच्या मनात आजही कायम आहेत. समुद्राच्या पलिकडे राहणाऱ्या तमीळ नागरिकांच्या अधिकारांसाठी आम्ही कायम उभे राहू.’ १८ मेच्या कारवाईच्या स्मरणार्थ भारतातील तमीळ नागरिक ‘मुलीवैक्कल स्मरण दिन’ म्हणून पाळतात. विजय यांच्या सरकारला ‘व्हीसीके’ने पाठिंबा दिला असून, हा पक्ष ‘एलटीटीई’चा समर्थक मानला जातो.
विजय यांच्या या पोस्टनंतर भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांना लक्ष्य करताना, ‘तुमच्या वडीलांच्या हत्येसाठी एलटीटीई जबाबदार होती,’ याकडे लक्ष वेधले आहे. ‘मुलीवैक्कल दिन’ हा हजारो तमीळ नागरिकांच्या नरसंहाराच्या संदर्भाने उल्लेख केला आहे. तो केवळ प्रभाकरनच्या मृत्यूसाठी पाळण्यात येत नाही, असे ‘टीव्हीके’ने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.