RSS
RSS 
पुणे

पुणे : रा.स्व.संघातर्फे विजयादशमी साजरी पण पथसंचलनाविना

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियम लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुणे महानगरातर्फे महापुरूषांना मानवंदना आणि वाद्यपूजन करीत विजयादशमीचा उत्सव साजरा करण्यात आला. पथसंचलन मात्र करण्यात आले नाही.

विजयादशमीला रा.स्व. संघ स्थापना दिनाच्या निमित्ताने महानगरातील मुख्य कार्यक्रमातंर्गत शिवाजीनगर भागातील एसएसपीएमएस शाळेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सघोष मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी पुणे महानगराचे महापौर मुरलीधर मोहोळे, रा.स्व.संघ पुणे महानगराचे संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कार्यवाह महेश करपे, कसबा भाग संघचालक प्रशांत कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शंख आणि भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले. यावेळी वीस जणांच्या घोषाच्या पथकाने वादन केले आणि मानवंदना दिली. याचप्रमाणे पर्वती भागात झालेल्या कार्यक्रमास उपमहापौर सरस्वती शेंडगे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

महानगरात उर्वरित ठिकाणी संघ कार्यालयांमध्ये प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांच्या आधीन राहून वाद्यपूजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मागील आठवडाभरापासून विविध भागांतील शाखांतर्फे शस्त्रपूजन उत्सव आणि मान्यवरांच्या व्याख्यानाचे ऑनलाइन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यास स्वयंसेवक, नागरिकांचा मोठा सहभाग लाभला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT