पुणे

मराठ्यांचे वाटोळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे

CD

मंत्री विखे पाटील यांच्यामुळे
मराठा समाजाचे वाटोळे

मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप

सकाळ वृत्तसेवा
वडीगोद्री, जि. जालना ः मंत्री राधाकृष्ण विखे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे ऐकून मराठा समाजाचे वाटोळे केले. सुरुवातीला ते समाजाचे कल्याण करतील, असे वाटले; मात्र त्यांनी समाजाचे नुकसान केले. आम्ही सरकारला समजून घेणार नाही. विखे यांनी समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समाजाचे नुकसान केल्याचा घणाघाती आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी (ता. ८) अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत केला.
जरांगे म्हणाले, ‘‘विखे अंतरवाली सराटीत आले किंवा नाही आले, तरी काही फरक पडणार नाही. त्यांनी अंतरवालीत येऊ नये. फडणवीस मराठ्यांची कामे करू देत नाहीत, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर करावे. विखे यांनी फडणवीस यांचे स्वप्न पूर्ण केले आणि आमचे वर्ष वाया घालवले. हैदराबाद आणि सातारा गॅझेट देतो, असे ते म्हणाले. ५८ लाख कुणबी नोंदींचे प्रमाणपत्र देतो, असेही म्हणाले; मात्र त्यांनी काहीच दिले नाही. ईसीबीसी एकनाथ शिंदे यांनी दिले.
‘‘फडणवीस यांचे गुणगान गायचे आणि शरद पवार यांनी काही दिले नाही, हे वारंवार सांगण्याचे काम विखे यांनी केले. त्यांनी काही दिले नाही, तुम्ही दिले आणि रद्द करून नुकसान केले. त्यांनी काही दिले नाही, एवढेच सांगण्यासाठी विखे यांना अंतरवाली सराटीत पाठवले जात होते. त्यांनी दिले नाही, वाटोळे केले नाही; तुम्ही देऊन रद्द केले आणि नुकसान केले. मराठ्यांसाठी तुम्ही कलंक आहात,’’ असा गंभीर आरोपही जरांगे यांनी मंत्री विखे पाटील यांच्यावर केला.
मराठा क्रांती मोर्चा, मराठा संघटना आणि समन्वयक फोडून त्यांना विरोधात बोलण्यासाठी विखे, दोन-तीन मंत्री आणि काही आमदारांनी काम केले, असा आरोपही जरांगे यांनी केला.

अंतरवालीत येऊ नका
‘‘तुम्ही काय केले ते सांगा. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री संजय सिरसाट यांनी प्रमाणपत्रे देऊन रद्द केली आणि नुकसान केले. मराठ्यांना काहीच मिळाले नाही. याचे खापर तुमच्यावर फुटणार आहे. तुम्ही अंतरवाली सराटीत येऊ नका,’’ असे म्हणत जरांगे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली.

मला बोलायला लावू नका
‘‘मला बोलायला लावू नका. मराठा क्रांती मोर्चा फोडणे, समन्वयक फोडून त्यांना साथ देणे आदी कामे तुम्ही केली. अजून मी खूप बोलणार आहे. मराठ्यांचे वाटोळे मंत्री विखे यांच्यामुळे झाले आहे,’’ असा आरोप जरांगे यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा कोकणचा प्रवास सुकर! सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वे सुरु, 'अशी' करा सीट बुक

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

SCROLL FOR NEXT