पुणे

कोपर्डे हवेली : पोदार मध्ये विक्रम वेताळ व द स्टोरी क्लिक ची रंगार

CD

‘विक्रम आणि वेताळ’ने जिंकली मने

पोदार स्कूलमध्ये स्नेहसंमेलन; ‘द स्टोरी क्विल्ट’मध्ये गोष्टींतून शिकवण

कोपर्डे हवेली, ता. ३० : पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये १३ वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. संमेलनात इयत्ता पहिली, दुसरी, पाचवी व नववीसाठी ‘द स्टोरी क्विल्ट’, तर इयत्ता तिसरी, सातवी, आठवी, तसेच चौथी, सहावी, दहावी, अकरावी व बारावीसाठी ‘विक्रम आणि वेताळ’ या संकल्पनांवर आधारित विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
२३ व २४ डिसेंबरला स्नेहसंमेलन झाले. प्राथमिक विभागाने जुन्या-नव्या गाण्यांची मेडली, तर माध्यमिक विभागाने तबला, ढोलकी, पखवाज यांच्या साथीने जुगलबंदी सादर केली. शाळेचे प्राचार्य अन्वय चिकाटे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
२३ डिसेंबरच्या सकाळच्या पहिल्या सत्राचे उद्‍घाटन सातारा सैनिक स्कूलचे प्राचार्य कॅप्टन के. श्रीनिवासन यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून मधुसूदन सोनवणे व कविता नाडे उपस्थित होते.
सायंकाळच्या दुसऱ्या सत्राचे उद्‍घाटन कर निर्धारण अधिकारी सुविधा पाटील यांनी केले, तर रमेश कांबळे उपस्थित होते. २४ डिसेंबरच्या तिसऱ्या सत्राचे उद्‍घाटन जीएसटी उपआयुक्त दीपाली पुजारी-शेलार यांनी केले. या वेळी जी. बी. पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार झाला.
‘द स्टोरी क्विल्ट’मध्ये आजी- आजोबांच्या गोष्टींमधून मिळणारी शिकवण, तर ‘विक्रम-वेताळ’मध्ये निर्णयक्षमता, धैर्य, कर्तव्य व पर्यावरण संरक्षण यांचा संदेश प्रभावीपणे मांडला गेला. ‘छत पर काला कौआ’, ‘रुकी सुखी रोटी’, ‘आ देखें जरा’, ‘हर हर गंगे’ यासारख्या गीतांवर नृत्ये विशेष कौतुकास पात्र ठरली.
कार्यक्रमासाठी उपप्राचार्या स्वाती नांगरे, विशाल जाधव, मेघा पवार यांच्यासह शिक्षक- कर्मचारी व स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले.

----------------------------

02296
कोपर्डे हवेली : स्नेहसंमेलनात नृत्य सादर करताना विद्यार्थिनी. (जयंत पाटील : सकाळ छायाचित्रसेवा)

----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Economy: गुड न्यूज! भारत बनला जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकलं मागे, GDP किती?

Kannad Minor Boys Missing : शाळेत जातो म्हणत घराबाहेर पडले; कन्नडमधील तीन अल्पवयीन मुले रहस्यमयरीत्या बेपत्ता!

Dombivli Elections : कल्याण–डोंबिवली रणधुमाळीत मनसेचा प्रयोग; जैन समाजातील उमेदवार मैदानात!

Palghar News : ७/१२ वर खोट्या नोंदींचा आरोप; मोखाडा तहसीलदार कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न!

Latest Marathi News Live Update : पुण्यात आणखी एका गुंडाने भरला उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT