पुणे

श्रमिक पत्रकार संघ निवडणूक

CD

PNE26W57087
विक्रम खेलबुडे

श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विक्रम खेलबुडे
‘सकाळ’चे अरविंद मोटे उपाध्यक्ष, तर समीर कार्यकर्ते कार्यकारिणीत

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ११ : सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार विक्रम खेलबुडे यांची सलग १४ व्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. सरचिटणीसपदी पत्रकार आफताब शेख, तर खजिनदारपदी विजय गायकवाड यांची निवड करण्यात आली. ‘सकाळ’चे वरिष्ठ बातमीदार अरविंद मोटे यांची उपाध्यक्षपदी, तर उपसंपादक समीर कार्यकर्ते यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.
संघाच्या सभागृहात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या वर्षासाठी नूतन कार्यकारिणी जाहीर झाली. प्रारंभी मावळते सरचिटणीस सागर सुरवसे व मावळते खजिनदार किरण बनसोडे यांनी आर्थिक तपशील मांडला. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार राजापुरे, तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष सिरसट यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.
नूतन पदाधिकारी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष - अरविंद मोटे, अविनाश गायकवाड, नितीन पात्रे, संगमेश जेऊरे, रुपेश हेळवे. चिटणीस - अमोल व्यवहारे, रतन बनसोडे, प्रीतम पंडित व लखन अदाटे. सहचिटणीस - धनंजय मोरे, विनोद हुमनाबादकर, रोहित थळवे. कार्यकारिणी सदस्य : समीर कार्यकर्ते, विजयकुमार राजापूरे, अरुण रोटे, शीतलकुमार कांबळे, दीपक दुपारगुडे, रवींद्र दंतकाळे, राजेश कुलकर्णी, रवी ढोबळे, श्रीनिवास मावनूर, गौतम गायकवाड, विक्रांत कालेकर, पिंटू विभुते, सचिन जाधव, यशवंत गुरव, नितीन कटके, अंबादास पोळ, मुजम्मील शाहनूरकर, सुदर्शन भालेराव, सागर इप्पलपल्ली, महेश कुलकर्णी, आरती कुसेकर. सल्लागार : प्रशांत जोशी, शंकर जाधव, हेमंत चौधरी.

चौकट...
नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान
दैनिक ‘सकाळ’चे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील, ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार देशपांडे, नारायण कारंजकर, प्रशांत जोशी आणि राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी सहकार्य केल्याबद्दल शिखर पहारिया फाउंडेशन आणि महापौर विनायक कोंड्याल यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार मनीष केत यांची महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT