Vikramgad Villagers built a bamboo bridge for students to go to school 
पुणे

विक्रमगड : विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी नव्हता पूल, ग्रामस्थांनी बांधला बांबूचा पूल

नाल्यावरील मातीचा छोटा पुल मुसळधार पावसाने पुरात वाहून गेला

अमोल सांबरे

विक्रमगड - विक्रमगड तालुक्यात व परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने परिसरातील नदी, नाले व धरणे भरून वाहत आहेत. परिणामी अनेक समस्या निर्माण होत आहेत. बुरुजपाडा येथील विध्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जायच्या रस्त्यावर नाला असल्याने या नालावरील मातीचा छोटा पुल मुसळधार पावसाने पुरात वाहून गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार होते. ते टाळण्यासाठी तेथील गावकऱ्यांच्या मदतीने दोन दिवसात बांबूचा पूल करून विद्यार्थ्यांचा शाळेचा मार्ग सुखकर केला आहे.

पालघर जिल्ह्यात मागील आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पावसाच्या पुरात विक्रमगडमधील मलवाडा ग्रामपंचायत हद्दीतील बुरुज पाडा आणि दिवेपाडाला जोडणाऱ्या एकमेव रस्त्यावरील माती भराव करून तयार केलेला पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. बुरुज पाडा ते दिवेपाडा हा रस्ता मागील वर्षी रोजगार हमी योजने अंतर्गत करण्यात आला होता. पाईप आणि मातीच्या साहाय्याने तयार केलेला पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्यावर धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे या पुलाखाली टाकण्यात आलेल्या पाईपला रिंगाच जोडण्यात आल्या नाहीत. गावकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना गावाबाहेर पडण्यास होणारी अडचण तसेच शाळेत जाता येत नाही. त्यामुळे ही महत्वपूर्ण समस्या बघता गावकऱ्यांनी या पुलाच्या जागी बांबूच्या साहाय्याने पूल तयार केला आहे.

गावकऱ्यांची शाळेविषयी असलेली आत्मीयता, सहकार्याची भावना आणि विद्यार्थ्यांच्या समस्येचे निराकरण करण्याची तीव्र इच्छा, यातून निर्माण झाला लाकडी पूल. यासाठी लागणारे बांबू, लाकडे, दोरी ज्यांच्याकडे उपलब्ध होते त्या ग्रामस्थांनी आपल्या घरुन आणून दिले. अवघ्या दोन दिवसांत नाल्यावर पूल तयार करण्यात आला. बांबूच्या पुलावरून जाण्याचा विद्यार्थ्यांचा आनंद आणि उत्साह काही वेगळाच होता. आता विद्यार्थी नियमित शाळेत जात-येत आहेत. पूल तयार करण्यासाठी गोपाळ धामोडा,दिलीप चौधरी,दिपक भडांगे,कैलास धामोडा,जानू चौधरी,अनंता जाधव यांनी परिश्रम घेतले.

मलवाडा ग्रामपंचायत हद्दीतील बुरुजपाडा अतिदुर्गम भागात आहे. बुरुजपाडा येथून दिवेपाडा येथे येण्यासाठी जेमतेम पायवाट आहेत त्याही नाल्यातून. यामुळे येथील शाळेतील विद्यार्थी या रस्तावर ये-जा करतात. मात्र मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पाऊस व पुरामुळे मातीचा पुल वाहून गेल्याने. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी गावकरी मिळून बांबूचा पूल बनवला.

- गोपाळ रामू धामोडा, बुरुजपाडा.

गावातील विध्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने आम्ही गावात असलेल्या साधनाचा वापर करून आम्ही बांबुचा पूल तयार केला.

- दिलीप वाळकु चौधरी, बुरुजपाडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT