Vilas Waghchaure sakal
पुणे

Vilas Waghchaure : अठराशे किलोमीटर पायी प्रवास ९० दिवसात

सुप्याच्या विलास वाघचौरे याने केली बारामती ते केदारनाथ पायी वारी.

सकाळ वृत्तसेवा

सुपे - सुपे (ता. बारामती) येथील सर्पमित्र विलास वाघचौरे या तरुणाने गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत दुचाकी, सायकलवरून आणि आता पदयात्रा करत शेकडो किलोमीटरचा बारामती ते केदारनाथ प्रवास ९० दिवसात पूर्ण केला. त्यांच्या या तिहेरी साहसाबद्दल बारामती आणि सुपे परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

गुरुवारी (ता. २३) सकाळी वाघचौरे बारामतीत पोहोचले. त्यांचा भिगवण चौकात बारामती सायकल क्लबच्यावतीने सत्कार करण्यात आला. तर सुप्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी या पदयात्रेची सांगता केली. या वेळी सुपे व परिसरातील अनेकांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले. या वेळी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा मनोदय वाघचौरे यांनी व्यक्त केला.

वाघचौरे यांनी २०२२ मध्ये मोटारसायकलवर पाच हजार आठशे किलोमीटरचा प्रवास २६ दिवसात करून केदारनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर २०२३ मध्ये सायकलवरून त्यांनी पाच हजार सहाशे किलोमीटर अंतर प्रवास करून केदारनाथ गाठले. या वेळी नेपाळसह दहा राज्यातून व्यसन मुक्तीचा संदेश देत ८४ दिवसात सायकल प्रवास पूर्ण केला.

त्यावर यावर्षी १८ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनादिवशी बारामतीच्या भिगवण चौकातील श्री गणेश मंदिरापासून पायी प्रवासाला सुरवात केली होती. एक हजार आठशे किलोमीटरचा प्रवास करून ९० दिवसात केदारनाथला पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली. सायकल प्रवासासाठी बारामती सायकल क्लबचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.

वेगवेगळ्या राज्यांतून प्रवास करत असताना अनेक लोकांनी सहकार्य केले. जेवण, रहाण्याची सोय, आर्थिक मदतीसाठी अनेकांचे हात पुढे आले. या प्रवासात देशातील दहा राज्यातील व नेपाळमधील जनजीवन जवळून समजून घेण्याचा अनुभव आला. बारामती ते केदारनाथ दरम्यान पर्यावरण, सायकल चालवण्याचे फायदे, व्यसनमुक्ती व बेटी बचावा विषयी जनजागृती केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT