Manchar Police Inspector Mahadev Waghmode guides villagers during a security meeting at Valti in Ambegaon taluka.

 

esakal

पुणे

CCTV Security,:आपले गाव,आपली निगराणी’या उपक्रमांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत ग्रामस्थ सकारात्मक.

Village CCTV Security, Gram Suraksha Dal, Ambegaon : ‘आपले गाव, आपली निगराणी’ उपक्रमांतर्गत वळती व थोरांदळे गावांत महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत ग्रामस्थांनी सकारात्मक भूमिका घेतली.

सकाळ वृत्तसेवा

निरगुडसर: आपले गाव,आपली निगराणी’या उपक्रमांतर्गत लोकसहभागातून गावातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत ग्रामस्थांना सूचना देण्यात आल्या यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत ग्रामस्थानी सकारात्मक भूमिका घेतली. आंबेगाव तालुक्यातील मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वळती व थोरांदळे गावांमध्ये तसेच वाड्या-वस्त्यांवरील चोरीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी ग्रामसुरक्षा दल पुन्हा सक्रिय करण्याचे आवाहन मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी केले.

मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी वळती व थोरांदळे गावांना भेट दिली,यावेळी दोन्ही गावांमध्ये ग्रामस्थांच्या बैठका घेऊन गावातील सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली.गावातील वाड्या-वस्त्यांवर तसेच गावापासून दूर असलेल्या घरांमध्ये चोरीच्या घटना घडू नयेत यासाठी पोलिस गस्त वाढविणे,सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तसेच इतर आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. गावातील महत्त्वाच्या ठिकाणी सरपंच,ग्रामपंचायत सदस्य, दुकानदार,व्यापारी,पेट्रोलपंपचालक व अन्य व्यावसायिक यांच्या सहभागातून जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

गावातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा असून,ग्रामसुरक्षा दल पुन्हा सक्रिय केल्यास संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे.या उपक्रमास ग्रामस्थांनी तसेच तरुण वर्गाकडून सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.यावेळी

बैठकीस दोन्ही गावांतील आजी-माजी सरपंच,उपसरपंच,पोलिस पाटील तसेच तरुणांसह सुमारे २५ ते ३० ग्रामस्थ उपस्थित होते.

वळती येथील बैठकीस पोलीस पाटील प्रकाश लोंढे,बाबाजी भोर महेश भोर आदी तरुण व ग्रामस्थ उपस्थित होते. फोटो खाली ओळ:वळती (ता.आंबेगाव)येथील ग्रामस्थांच्या बैठका घेऊन गावातील सुरक्षा व्यवस्थेबाबत मार्गदर्शन करताना मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: अंगणवाडी सेविका आईच्या Gen Z लेकाने बदलले कुटुंबाचे नशीब; UPSCत ५७४ वा क्रमांक मिळवत झाला IPS, सर्व भावूक

‘आराधी आलाय नवा ग नवा’ ऐश्वर्या नारकर अन् तितीक्षा तावडेंचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले... ‘एक स्वामिनी तर दुसरी दामिनी…’ Video

Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा सस्पेन्स संपला; दोन राज्यांत उमेदवारांची घोषणा, कोण आहेत चेहरे? एक तर अभिनेत्री

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? नवी अपडेट समोर

Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

SCROLL FOR NEXT