पुणे

देवस्थान निवडणुकीत ग्रामदैवत विकास मंडळाचा एकतर्फी विजय

CD

ग्रामदैवत विकास मंडळाचा दणदणीत विजय
श्री सिध्देश्वर देवस्थानचा विश्वस्त मंडळ निवडणूक
श्रीगोंदे, ता. ६ : आढळगाव (ता. श्रीगोंदे) येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या निवडणुकीत ग्रामदैवत विकास मंडळाने सर्व २५ जागा जिंकत एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. उत्तम राऊत, शरद जमदाडे व शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंडळाने हा दणदणीत विजय मिळविला.
चार ऑक्टोबरला झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत तीन मंडळांचे ७५ उमेदवार रिंगणात होते. एकूण ३ हजार ७५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी सातनंतर सिद्धेश्वर मंदिर परिसरात मतमोजणी सुरू झाली. मतपत्रिकेद्वारे मतदान झाल्याने मतमोजणीस तब्बल दहा तास लागले. सकाळी सातच्या सुमारास अंतिम निकाल जाहीर झाला.
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच ग्रामदैवत विकास मंडळाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. अखेरपर्यंत ही आघाडी कायम राहिली आणि सर्व २५ उमेदवार विजयी झाले.
देवस्थानचा पारदर्शक कारभार, स्वच्छता, भाविकांसाठी सुविधा आणि मंदिराच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा मंडळाने प्रचारात मांडला होता. त्याला मतदारांनी स्पष्ट कौल दिल्याचे या निकालातून दिसून आले. विजयानंतर समर्थकांनी फटाके फोडून व गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
निवडणूक निर्णय अधिकारी अशोक गुंड यांनी मतदान व मतमोजणी प्रक्रिया शिस्तबद्धपणे पार पाडली. श्रीगोंदे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
-------
विजयी उमेदवार ः गणेश गाढवे, संदीप सूर्यवंशी, राहुल राऊत, शिवाजी म्हेत्रे, हरिश्चंद्र गव्हाणे, संजय डोके, शरद शिंदे, संपत डोके, जिजाराम डोके, नवनाथ शिंदे, सतीश वाकडे, पांडुरंग काळे, गणेश शिंदे, बाळू शिंदे, पांडुरंग बोळगे, रघुनाथ शिंदे, हरिभाऊ डाळिंबे, दीपक काळाणे, विजय वाकडे, दत्तात्रय काळे, पोपट जमदाडे, शेखर गव्हाणे, अभिमन्यू ठवाळ, देविदास काळे, मच्छिंद्र वडवकर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

Marathi News Live Updates: राहुल गांधी, प्रियंका गांधींना घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT