ग्रामपंचायतीचा आराखडा महत्त्वाचा...
-------------------
१) ग्रामपंचायतीमार्फत आणि ग्रामसभेच्या मान्यतेने तयार केलेला आराखडा कितपत यशस्वी झाला? गावाच्या पायाभूत सुविधा, शाश्वत विकासाच्या ध्येयानुसार किती अंमलबजावणी झाली हे नियमितपणे पहाणे पुनर्विलोकन करणे आवश्यक ठरते.
२) दर पाच वर्षांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका येतात. त्यामध्ये लोकनियुक्त सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य हे लोकांमधून निवडून देण्यात येतात. त्यांच्यावर ग्रामपंचायतीच्या विकासाची धुरा सोपवण्यात येते. ते ग्रामपंचायतीचे विश्वस्त म्हणून पाच वर्षांच्या कालावधीसाठी काम करणे अपेक्षित असते. नव्याने निवडून आलेल्या सरपंचांसाठी त्यांच्या पूर्वीच्या कालखंडामध्ये तयार केलेल्या ग्रामविकास आराखड्याची प्रत ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध असल्यास ती जरूर पहावी.
३) प्रत्येक वर्षांचा आराखडा पहावा. पंचवार्षिक आराखड्यात सुचविण्यात आलेली कामे, त्यानुसार वार्षिक आराखड्यामध्ये समाविष्ट असलेली कामे, त्यासाठी आलेला निधी, आणि त्या निधीचा विनियोग कसा झाला? हा प्रवास पहावा. विकास आराखड्यामध्ये नमूद केलेल्या बाबीनुसार प्रत्यक्ष काम झाले किंवा कसे हे पाहणे आणि याचे सामाजिक अंकेक्षण होणे गरजेचे आहे.
४) ठरविल्याप्रमाणे पैसे आले का ? आलेल्या पैशांचा योग्य पद्धतीने वापर झाला का ? त्याच्या विनियोगामध्ये काही कमतरता किंवा अनियमितता जाणवते का? अपेक्षित असे मूलभूत सुविधा, जलसंचय शिक्षण, व्यवसाय, उद्योग, उपजीविका, कृषी या क्षेत्रामध्ये निश्चित काय बदल झाला याचा गांभीर्याने ग्रामपंचायत स्तरावर सरपंच आणि सदस्यांनी एकत्र येऊन विचार करावा.
ग्रामपंचायतीची वस्तुस्थिती ः
आज आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य सर्व सक्षम आहेत हे सकृतदर्शनी स्पष्ट होते. परंतु तातडीच्या आणि दररोजच्या कामांमध्ये त्यांचा बराचसा वेळ जात असल्यामुळे, रचनात्मक दीर्घकालीन आराखडा आणि पुढील कालावधीसाठी लागणाऱ्या गरजांनुसार गावाचे नियोजन करण्यासाठी त्यांच्याकडे ना योग्य दिशा योग्य मनुष्यबळ. यामुळे ग्रामपंचायतीचा प्राधान्यक्रम बदलतो. दररोज येणारे प्रश्न उदाहरणार्थ दिवाबत्ती, कर वसुली, कचरा उचलणे, सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी शक्य असेल ते प्रयत्न करणे इत्यादी दैनंदिन बाबीवर लक्ष केंद्रित करण्यात येते.
१) गावातील शिक्षक, अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी आणि तुमच्या गावासाठी दिलेला संपर्क अधिकारी यांच्यासोबत गावामध्ये सेवानिवृत्त असलेल्या शासकीय, खासगी संस्थेत काम करणारे कर्मचारी, त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालयातील तज्ञ व्यक्ती, स्वयंसहायता गटातील ग्राम संघाच्या प्रभाग संघाच्या पदाधिकारी या सर्वांचा अभ्यास गट तयार करावा. या गटांच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. ग्रामसभेमध्ये या बाबींवर चर्चा करून निर्णय घेऊन अभ्यास गट स्थापन करावा.
२) कामामध्ये पारदर्शकता असणे अत्यंत गरजेचे आहे. उपरोक्त शासन निर्णय तसेच केंद्र शासनाच्या सूचनांप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर प्रस्तावित करण्यात आलेले आणि मंजूर झालेल्या प्रत्येक कामाच्या बाबतीत फलक कामाच्या ठिकाणी दर्शनी भागात लावावे, त्यामध्ये त्या कामाच्या आराखड्याची किंमत, किती कालावधीत काम पूर्ण करावयाची आहे इत्यादी तपशील आवश्यक आहे.
३) सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी आपापल्या वार्डातील लोकांच्या गरजा, वॉर्ड सभा घेऊन एकत्रित कराव्यात. त्यांचे संकलन करून संपूर्ण ग्रामपंचायत क्षेत्राचा आराखडा तयार करावा. या बैठकीस पर्यवेक्षीय अधिकारी, कर्मचारी यांना लेखी कळवावे आणि ग्रामसभेस/ग्रामपंचायत सभेस बोलवावे. याच सभेस विस्तार अधिकारी (पंचायत समिती) यांनाही बोलवावे. त्यांच्या सल्ल्यानुसार त्यामध्ये सुधारणा करून आराखडा अंतिम करावा. या आराखड्यास विस्तार अधिकारी (पंचायत) यांची मान्यता घ्यावी.
------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.