पुणे

40 गावांमध्ये ग्राम सुरक्षा दलाची निर्मीती केली जाणार -संदीप पोणम

CD

गावागावांत होणार ग्राम सुरक्षा दल

संदीप पोणम; भुरट्या चोऱ्यांना आळा घालण्याचा प्रयत्न

म्हसवड, ता. ३० : येथील पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील एकूण ४० गावांमध्ये ग्राम सुरक्षा दलाची निर्मिती केली जाणार असून, या दलातील सुरक्षा रक्षकांना पोलिस दलातर्फे साहित्याचे वाटपही केले जाणार असल्याची माहिती म्हसवड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमण यांनी दिली आहे.
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशाने या नियुक्त्या केल्या जाणार असून, उद्या (शनिवारी) सायंकाळी सहा वाजता म्हसवड पोलिस ठाणे येथे ग्राम रक्षकांना साहित्याचे वाटप केले जाणार आहे, तर नुकत्याच झालेल्या गणेशोत्सात ज्या मंडळांनी पोलिस ठाण्याच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले आहे, अशा सावर्जनिक गणेश मंडळांना गणराया अवॉर्ड देऊन याच ठिकाणी सन्मानित केले जाणार आहे. त्यामुळे पोलिस ठाणे हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. पोमण यांनी केले आहे.
दरम्यान, पोलिस ठाणे हद्दीमध्ये वाढत्या भुरट्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक पिंगळे यांच्या सूचनेनुसार गावोगावी ग्राम सुरक्षा दलाची स्थापना केली जात असून, यातील सदस्यांना पोलिसांचे सर्व सहकार्य दिले जाणार आहे. गावातील पोलिस पाटील व ग्राम रक्षक यांच्यावर त्या- त्या गावाची जबाबदारी दिली जाणार आहे. पोलिसांची संख्या अपुरी असून, हद्दीत एखादी घटना घडल्यास पोलिसांना घटनास्थळी पोहचण्यास विलंब होत आहे. यापुढे अशा घटनांना आळा बसावा, यासाठी पोलिस प्रशासन ही ॲक्शन मोडवर आले आहे.

--------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ausa Crime : शेतातील शेडमध्ये सुरू होता बनावट दारूचा कारखाना! येल्लोरीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा; ५.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं मोठं पाऊल! मुदत संपलेल्या अन्नपदार्थांच्या पुनर्विक्रीबाबत नवे नियम लागू

Marathi News Live Updates : नवी मुंबई महापालिकेच्या दुर्लक्षाविरोधात ठाकरे सेना आक्रमक; तुर्भे उड्डाणपुलासाठी ठाणे-बेलापूर महामार्ग रोखला

Eye Infection Alert in Pune: डोळे येण्यापासून बचावासाठी फक्त औषधं पुरेशी नाहीत! वैयक्तिक स्वच्छतेबाबत डॉक्टरांनी दिला कानमंत्र

गुरुच्या राशीबदलाने ५ राशींना अच्छे दिन! करिअरमध्ये प्रगती, रखडलेली कामंही पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT