village sevak Threatened to kill entire family if ransom is not paid crime pune
village sevak Threatened to kill entire family if ransom is not paid crime pune esakal
पुणे

Pune Crime : ग्रामसेवकाला डांबून ठेवून विषारी औषध पाजण्याची भीती; खंडणी न दिल्यास संपूर्ण कुटुंबाला ठार करण्याची धमकी

निलेश बोरुडे

सिंहगड : बंद स्थितीत असलेल्या हॉटेलमध्ये हातपाय बांधून जीवे मारण्याची धमकी देत गुगल पे ने 73 हजार रुपयांची खंडणी उकळण्यात आल्याची व मोबाईल आणि कार बळजबरीने ताब्यात घेत आणखी दीड लाखांची मागणी केल्याची धक्कादायक घटना खडकवासला धरणाला लागून असलेल्या कुडजे(ता. हवेली) या गावच्या हद्दीत घडली आहे.

याप्रकरणी विकास प्रकाश गायकवाड (वय 38, रा. कुडजे , ता. हवेली जि पुणे) व त्याच्या इतर दोन अज्ञात साथीदारांच्या विरोधात उत्तम नगर पोलीस ठाण्यात ग्रामसेवक महेशकुमार खाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ग्रामसेवक महेश कुमार खाडे हे कार्यालयीन कामकाज आवरुन घरी जाण्यासाठी निघाले होते. कुडजे गावच्या स्मशानभूमीजवळ आरोपींनी खाडे यांच्या चार चाकी समोर बिअरची बॉटल फोडून गाडी अडवली. तेथून आरोपींनी खाडे यांना जबरदस्तीने बंद अवस्थेत असलेल्या हॉटेलवर नेले व रस्सीने हातपाय बांधले.

त्यानंतर एक औषधाची बाटली दाखवत 'आत्ताच्या आत्ता पैसे दे नाहीतर तुला हे औषध पाजून मारून टाकू' अशी धमकी दिली. घाबरलेल्या खाडे यांनी स्वतःच्या खात्यात असलेले 49 हजार रुपये व आपल्या मित्राकडून आणखी 24 हजार मागून एकूण 73 हजार रुपये आरोपींना गुगल पे करून दिले. आरोपींनी खाडे यांचा मोबाईल व कारची चावी काढून घेत, 'उद्या आणखी दीड लाख रुपये आणून दे नाहीतर तुझ्यासह संपूर्ण कुटुंबाला मारून टाकू' अशी धमकी दिली.

'पैसे आणून देतो पण मारू नका', असे सांगितल्यानंतर आरोपींनी खाडे यांना सोडून दिले. घडलेला प्रकार खाडे यांनी आपल्या मित्रांना व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवला. त्यानुसार उत्तमनगर पोलीस ठाण्यात विकास गायकवाड व इतर दोन अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार झाले असून पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार याबाबत अधिक तपास करत आहेत.

" मुख्य आरोपी सध्या फरार असून इतर दोन आरोपींची अद्याप ओळख पटलेली नाही. अत्यंत गंभीर प्रकार असल्याने कसून तपास करत आहोत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल. फिर्यादींच्या सुरक्षेचीही काळजी घेण्यात येत आहे."

- दादाराजे पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उत्तमनगर पोलीस ठाणे, पुणे शहर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल प्रकरणी विभव कुमार यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

Aye Haye Oye Hoye Viral Song: जे गाणं ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी कानावर ठेवले हात, त्याचं ओरिजनल व्हर्जन आहे भन्नाट

Indian Team Coach : द्रविड, लक्ष्मणनंतर ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाचाही नकार; हेड कोच निवडताना बीसीसीआयची वाढणार डोकेदुखी?

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

SCROLL FOR NEXT