Environment 
पुणे

गावकरीच बनणार आता पर्यावरणाचे रक्षक

गजेंद्र बडे

पुणे - गावपातळीवर पर्यावरणरक्षणाची जबाबदारी ग्रामपंचायतींवर सोपविण्यात आली आहे. पर्यावरणाशी संबंधित घटकांचे सर्वेक्षण करून नोंदी केल्या जाणार आहेत. यामुळे गावेच आता पर्यावरणाचे ‘गार्ड’ असतील. 

राज्य सरकारने २००२ मध्ये जैवविविधता अधिनियम केला आहे. याची अंमलबजावणी आता सुरू केली आहे. यासाठी गावनिहाय जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापना करण्यात आल्या आहेत. या समित्यांनीच सामाजिक संस्थांच्या मदतीने गावांतील पर्यावरणाशी निगडित बाबींचा बायोडाटा तयार करणे अनिवार्य केले आहे.

येत्या १५ जानेवारीपर्यंत हा बायोडाटा तयार करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल नागपूर येथील जैवविविधता मंडळाकडे पाठविण्याचे बंधन जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागावर घालण्यात आले आहे. जिल्हा परिषदेने सर्वेक्षण करून त्याबाबत नोंदीसाठी जैवविविधता मंडळाच्या मदतीने सामाजिक संस्थांची नियुक्ती केली आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जैवविविधता व्यवस्थापन समित्यांची स्थापना केली आहे. आता गावनिहाय वनस्पती आणि वन्यजीवांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याच्या स्वतंत्र नोंदवह्या करण्याचा आदेश सर्व ग्रामपंचायतींना दिला आहे.   
- संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Shortage : केंद्राकडून महाराष्ट्रासाठी 'एवढं' रॉकेल मंजूर; एका शिधापत्रिकेसाठी किती पुरवठा होणार?

Latest Marathi News Live Update : भारतात लॉकडाऊनच्या अफवा पूर्णपणे निराधार-हरदीप पुरी

Sanjay Raut criticism government : सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देश पुन्हा 'रॉकेलच्या रांगेत'; संजय राऊत यांचा घणाघाती प्रहार

Childhood Diabetes and Heart Disease: दरवर्षी हजारो मुलांमध्ये टाइप-१ मधुमेह; २५ हजार नवजात बालकांना जन्मजात हृदयरोगाचीही होतेय नोंद

Jalgaon Road Accident : सप्तशृंगी पदयात्रेसाठी पायी निघालेल्या महिलेचा दुर्दैवी अंत; सैन्य अधिकारी चालवत होता कार, टायर फुटले अन्...

SCROLL FOR NEXT