villages of Satgaon Plateau and Khed taluka will get water from Kalmodi Dam
villages of Satgaon Plateau and Khed taluka will get water from Kalmodi Dam Sakal
पुणे

Manchar News : कलमोडी (ता. खेड) धरणाचे पाणी सातगाव पठार (ता आंबेगाव )व खेड तालुक्यातील गावांना मिळणार

डी. के वळसे पाटील

मंचर : कलमोडी (ता खेड)धरणातील पाणी आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार व खेड तालुक्यातील वापगाव वरुडे भागातील अनेक गावांना मिळणार आहे. धरणातून पाणी उचलण्याच्याकामाला खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सहमती दिली आहे.

त्यामुळे धरणाचे पाणी शेतीला मिळणार" अशी ग्वाही राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. सातगाव पठार भागातील आदर्शगाव कुरवंडी कोल्हारवाडी, या भागातील विकास कामे भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात गुरुवारी (ता.७) संध्याकाळीवळसे पाटील बोलत होते.

यावेळी विष्णू हिंगे निलेश थोरात सुभाषराव मोरमारे सरपंच मनीषा सुनील तोत्रे. उपसरपंच जितेंद्र जयसिंग तोत्रे, दत्तात्रेय तोत्रे, विकास बारवे, हरिदास मते व ग्रामस्थउपस्थित होते. सातगाव पठार भागातील प्रत्येक गावात सवाद्य मिरवणुकीने वळसे पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले .यावेळी महिला व युवकांची संख्या लक्षणे होती.

वळसे पाटील म्हणाले"धरणातील पाणी लिफ्ट द्वारे सातगाव पठार येथे आणण्यासाठीसुधारित आराखडा तयारकेला आहे. खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना कलमोडीचे पाणी मिळावे अशी मोहिते पाटील यांची मागणी होती.

त्यानुसारच सुधारित आराखडा तयार केला आहे या कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व महायुती सरकारचे चांगले सहकार्य मिळत आहे.त्यामुळे नजीकच्या काळात सातगाव पठार भागातील शेतीच्यापाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

वेळ नदीवर असलेल्या सर्व बांधाऱ्यातील गाळ व माती काढण्याचे काम भीमाशंकर कारखान्यामार्फत लवकरच सुरू केले जाणार आहे. त्यामुळे बंधाऱ्यातील पाणीसाठा क्षमतेत वाढ होईल.

बंधार्‍याप्रमाणे पाझर तलाव किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा साठा होणारअसले तरतेथीलही गाळ काढण्यासाठी पोकलेन, जेसीबी यंत्र उपलब्ध करून दिली जातील. कुरवंडी येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा सुरू करण्याबाबत कार्यवाही केली जाईल.

कामाच्या व्यापामुळे कदाचित सुखदुःखाच्या कार्यक्रमात मी सहभागी होऊ शकलो नाही तर नाराज अजिबात होऊ नका. पण मागणीनुसारसातगाव पठार भागातील सर्व गावातीलउर्वरित कामे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर जून ते ऑक्टोबर महिन्यात मार्गी लावली जातील. विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. तुमचे असेच प्रेम माझ्यावर ठेवा. "नितीन तोत्रे यांनी सूत्रसंचालन ,प्रास्ताविक सुनील तोत्रे व आभार तुषार तोत्रे यांनी मानले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT