वडगाव शेरी - पुणे महानगरपालिकेच्चा बांधकाम विभाग आणि नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने केलेल्या संयुक्त कारवाईत विमाननगर येथील अठरा हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या अनधिकृत पत्रा शेड कारवाईत हटवण्यात आल्या. दोन दिवस सुरू असलेल्या या कारवाईत तब्बल 76 मिळकतींवर हातोडा पडला.
विमाननगर भागातील मोकळे भूखंड आणि इमारतींच्या समोरील आणि बाजूच्या अनधिकृत पत्रा शेडवर कारवाई करण्यात आली. या भागात पहिल्यांदाच सलग दोन दिवस कारवाई झाली. त्यामुळे अतिक्रमण केलेल्या अनेकांचे धाबे दणाणले. अनधिकृत पत्रा शेडवरील उर्वरित कारवाई सोमवारी (ता. १८) करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या उपायुक्त किशोरी शिंदे, बांधकाम विभागाचे उपाभियंता एकनाथ गाडेकर, कनिष्ठ अभियंता इरफान शेख, नगरास्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर, अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांनी संयुक्तपणे कारवाई केली. सलग दोन दिवस कारवाई सुरू असल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त यावेळेस ठेवण्यात आला होता.
अनेक ठिकाणी व्यावसायिकांनी कारवाई करणाऱ्या पथकावर दबाव आणण्याचा तसेच वाद घालण्याचा प्रयत्न केला. परंतु हा दबाव झुगारून सलग दोन दिवस कारवाई झाली.
नुकसान टाळण्यासाठी अनेक व्यवसायिकांनी आपले अनधिकृत शेड स्वतःहून काढून घेतले. तसेच कारवाईतून वाचण्यासाठी अनाधिकृत खाद्यपदार्थांचे स्टॉल अनेक व्यावसायिकांनी क्रेनच्या सहाय्याने उचलून खाजगी मिळकतीत नेऊन ठेवले.
कारवाई विषयी एकनाथ गाडेकर म्हणाले, विमाननगर मधील अनधिकृत टेरेस हॉटेल, तसेच उर्वरित अतिक्रमण, पत्रा शेड यावर कारवाई सुरूच राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.