पुणे

जागतिक मास्टर्स वरिष्ठ टेनिस स्पर्धा

CD

विनीत तेहराचा उपांत्य फेरीत प्रवेश
जागतिक मास्टर्स वरिष्ठ टेनिस

पुणे, ता. १४ ः नांदेड येथे नांदेड जिल्हा व शहर टेनिस संघटना आयोजित कोहिनूर-एनईएस करंडक एमटी २०० जागतिक मास्टर्स वरिष्ठ गट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत ३५ वर्षांवरील पुरुष गटात विनीत तेहराने दुसऱ्या मानांकित हर्ष तलाजियाचा ६-४, ६-४ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे.
आयटीएफ, एआयटीए, एमएसएलटीएच्या मान्यतेने नांदेड येथील एनईएस सायन्स कॉलेजच्या टेनिस कोर्टवर शनिवार पासून सुरु झालेल्या या स्पर्धेत ३५ वर्षांवरील पुरुष गटात शशांक बोमनाळेने गौरव बांगचा ६-४, ६-२ असा पराभव केला. ३० वर्षांवरील पुरुष गटात दुसऱ्या मानांकित गौरव रावने सनत मेहरावर ६-०, ६-० असा विजय मिळविला.
४० वर्षांवरील पुरुष गटात उपांत्यपूर्व फेरीत गणेश देवखिलेने तन्मय पंडितवर ६-१, ६-१ असा विजय मिळवला. ४५ वर्षांवरील पुरुष गटात अव्वल मानांकित स्वरणदीपसिंग धोडीने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत स्वामी राधारपूचे आव्हान ६-०, ६-१ असे परतावून लावले. पराग अत्रेने गुरू नंदन सिंगला ६-१, ६-० असे पराभूत केले.
या स्पर्धेच्या उद्‍घाटनप्रसंगी नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, पोलिस अधिक्षक नीलभ रोहन, शंतनू डोईफोडे, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रवीण पाटील आणि नांदेड क्लबचे सचिव मनीष डोईफोडे, स्पर्धा संचालक डी. एस. रामा राव, एमएसएलटीए कार्यकारी समितीचे सदस्य अली मोहम्मद पंजवानी, आयटीएफ सुपरवायझर वैशाली शेकटकर हे उपस्थित होते.
निकाल :
३० वर्षांवरील : उपांत्य फेरी : गौरव राव (भारत) वि.वि. सनत मेहरा (भारत) ६-०, ६-०; मोहित सोरडे (भारत) पुढे चाल विरुद्ध शोएल अली (भारत).
३५ वर्षांवरील ः विनीत तेहरा (भारत) वि.वि. हर्ष तलाजिया (भारत) ६-४, ६-४; शशांक बोमनाळे (भारत) वि.वि. गौरव बांग (भारत) ६-४, ६-२;
४० वर्षांवरील : गणेश देवखिले वि.वि. तन्मय पंडित ६-१, ६-१.
४५ वर्षांवरील : स्वरणदीपसिंग धोडी वि.वि. स्वामी राधारपू ६-०, ६-१; पराग अत्रे वि.वि. गुरू नंदनसिंग ६-१, ६-०;
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final, Video: मोहित उल्वाचा विजयी चौकार अन् भारताचा पाकिस्तानी खेळाडूंसमोर जल्लोष; आर्यवीर सेहवाग ठरला मालिकावीर

Manoj Jarange: 'पुढची क्लिप डेंजर!' जरांगेंचा नवा ऑडिओ बॉम्ब येणार? फडणवीस-शिंदेंना काय दिला इशारा?

'सहा महिने कोणी विचारलं नाही, की यूपी-बिहारच्या लोकांना बोलतात'; 'त्या' पोस्टवरून प्रशांत किशोरांची राज ठाकरेंवर टीका, काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update: वसई-विरारमध्ये २४ तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

IND vs PAK Asia Cup Final: कोण आहे मोहित उल्वा, ज्याने शेवटच्या चेंडूवर फोर मारत भारताला पाकिस्तानविरुद्ध जिंकवलं?

SCROLL FOR NEXT