पुणे

विनोद जाखड यांच्याकडे एनएसयूआयचे अध्यक्षपद

CD

विनोद जाखड यांच्याकडे
एनएसयूआयचे अध्यक्षपद
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २० ः काँग्रेस पक्षाने नॅशनल स्टुडंटस युनियन ऑफ इंडियाच्या (एनएसयूआय) राष्ट्रीय अध्यक्षपदी विनोद जाखड यांची नियुक्ती केली आहे. एनएसयूआय ही काँग्रेसप्रणित विद्यार्थी संघटना आहे. वरुण चौधरी यांच्याजागी जाखड यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. संघटन मजबूत करण्यासह युवा राजकारणात नवीन ऊर्जा आणण्याच्या उद्देशाने जाखड यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे. 
राजस्थानमधील जयपूर येथे १९९४ मध्ये दलित कुटुंबात जन्मलेल्या जाखड यांचे लहानपण संघर्षात गेले. ‘एमए’चे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी हिताच्या मुद्द्यावर त्यांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली. यानंतर ते एनएसयूआय संघटनेत सक्रिय झाले. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांना राजस्थान एनएसयूआयचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. युवकांनी व्यसनापासून मुक्त व्हावे, यासाठी जाखड यांनी आठशे किलोमीटरची सायकल यात्रा काढली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT