Pune News sakal
पुणे

Pune News : पुण्यात मद्यपी ‘सुसाट’; वेळेचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द

पुण्यात रात्री मद्यसेवन करून प्रमुख रस्त्यांवर वाहने भरधाव चालविण्याच्या घटना सर्रास दिसून येत आहेत. अशा मद्यपी वाहनचालकांमुळे पादचारी आणि इतर वाहनचालकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुण्यात रात्री मद्यसेवन करून प्रमुख रस्त्यांवर वाहने भरधाव चालविण्याच्या घटना सर्रास दिसून येत आहेत. अशा मद्यपी वाहनचालकांमुळे पादचारी आणि इतर वाहनचालकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. पोलिसांनी अशा मद्यपी वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

अल्पवयीन चालकांवर कारवाई

शहरात विनापरवाना वाहन चालविणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाणही वाढले आहे. वाहतूक पोलिसांकडून २०२३ मध्ये विनापरवाना वाहन चालविणाऱ्या १६ वर्षांखालील ४८ अल्पवयीन मुलांवर कारवाई झाली. २०२४ मध्ये १९ मेअखेर २६ अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई झाली आहे.

ड्रंक अँड ड्राईव्ह दृष्टिक्षेपात

वर्ष कारवाई

२०२२:३७

२०२३:५६२

१९ मे २०२४:अखेर:४७९

वेळेचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द

राज्य उत्पादन शुल्क विभागाने कल्याणीनगरमधील घटनेची गंभीर दखल घेतली आहे. नियमित वेळेपेक्षा अधिक काळ पब आणि हॉटेल सुरू ठेवणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. बेकायदा पब, रूफटॉप चालविण्यांवर कडक कारवाई करा, अशा सूचना विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या.

सूर्यवंशी म्हणाले, ‘‘मद्यविक्रीच्या वेळेचे उल्लंघन केल्यास हॉटेलचालकांना नोटिसा देण्यास सांगितले आहे. वेळप्रसंगी परवाने रद्द करण्याच्या सूचना दिल्या.’’ जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे म्हणाले, ‘‘वेळ अथवा हॉटेल सुरू करण्यात येणार आहे, ती जागा योग्य आहे की नाही हे पाहण्याचे व किती वाजेपर्यंत परवानगी द्यायची, हे अधिकार पोलिसांचे आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT