Anwar-Rajan
Anwar-Rajan 
पुणे

अन्य धर्माच्या द्वेषाने हिंसाचार वाढतो - अन्वर राजन

सकाळ वृत्तसेवा

पुणे - दुसऱ्या धर्माचा द्वेष करणे, ही आजची फार मोठी समस्या आहे. त्यामुळे हिंसाचाराला खतपाणी मिळते, अशी खंत गांधीवादी विचारवंत अन्वर राजन यांनी व्यक्त केली.

महात्मा गांधी यांच्या विचारांचे युवा अभ्यासक संकेत मुनोत यांनी संकलित केलेल्या ‘एक धैर्यशील योद्धा : महात्मा गांधी’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना अन्वर राजन बोलत होते. आचार्य शिवमुनीजी, युवाचार्य महेंद्रऋषीजी यांच्या सान्निध्यात हा कार्यक्रम झाला. त्यास गांधीवादी तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजन म्हणाले की, गांधीजी नेहमी म्हणत असत, की जगभरातील सर्व धर्मग्रंथांमध्ये खूप चांगल्या गोष्टी लिहिल्या आहेत. त्याचे अनुसरण करणे, हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी धर्मांतर करण्याची गरज नाही. जैन तत्त्वज्ञ श्रीमद्‌ राजचंद्र यांनी गांधीजींना हे पटवून दिले होते. गुरू नानक यांनीही गुरुग्रंथसाहिब या ग्रंथाच्या माध्यमातून विविध धर्मांतील संतांच्या रचनांना स्थान दिले. महंमद पैगंबर यांनीही समतेचा संदेश दिला. याच सर्व बाबींचा गांधींच्या तत्त्वज्ञानात समावेश असून, तो संकेत यांनी मोजक्‍या शब्दांत मांडल्याने पुस्तक वाचनीय झाले आहे.

आचार्य शिवमुनीजी म्हणाले, ‘गांधीजींच्या वैचारिक संदेशांचे वहन करणाऱ्या अशा पुस्तकांची आणि त्या कामासाठी स्वत:ला वाहून घेणाऱ्या अशा युवकांची देशाला नितांत गरज आहे. गांधीजी पुन्हा येऊ शकत नसतील. मात्र, आपण सर्वजण मात्र नक्कीच गांधी बनू शकतो. भगवान महावीर आणि गांधीजी यांच्या संदेशांत मोठे साम्य आहे. त्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा.’ तर, गांधीजींना केवळ हार-फुलांपुरते मर्यादित ठेवू नका, असे महेंद्रऋषीजी म्हणाले.

या समारंभाला राजेंद्र सुराणा, श्रीपाल ललवाणी, विजयकांत कोठारी, अभय छाजेड, विजय भंडारी, संजय चोरडिया यांच्यासह अरिहंत जागृती मंच, नोइंग गांधीझम ग्लोबल फ्रेंड्‌स, नाते टिकवू आदी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT