पुणे

विराज जोशी बातमी

CD

अभंग अमृतमधून विराज जोशी करणार स्वरबरसात

पाच नोव्हेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात पंडित भीमसेन जोशी यांच्या अजरामर अभंगांचे सादरीकरण

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २९ : ‘कानडा राजा पंढरीचा’… ‘आणि माझे माहेर पंढरी’… स्वर कानावर पडताच विठ्ठलभक्तीचा भाव मनात जागवणारे हे अभंग. भारतरत्न स्व. पंडित भीमसेन जोशी यांच्या गायकीने अजरामर केलेल्या या रचना त्यांचे नातू विराज जोशी यांच्या स्वरांतून अनुभवण्याची संधी सोलापूरकरांना मिळणार आहे. ‘अभंग अमृत’ या दिवाळी पहाट कार्यक्रमातून ५ नोव्हेंबरला हुतात्मा स्मृती मंदिरात ही स्वरबरसात रंगणार आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित हा कार्यक्रम सकाळी ६.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठीच्या प्रवेशिका मोफत असून त्या सकाळ कार्यालयात वितरित करण्यात येत आहेत. कार्यक्रमासाठी मुख्य प्रायोजक म्हणून यश डेव्हलपर्स व सहप्रायोजक एसीएस हॉस्पिटल्स यांचे सहकार्य लाभले आहे.

विराज जोशी हे पंडित श्रीनिवास जोशी यांचे चिरंजीव आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू आहेत. अभिजात संगीताची परंपरा लाभलेल्या विराज यांच्या गायनातून भीमसेनजींच्या अभंगगायकीचा वारसा अनुभवता येणार आहे. त्यांना ‘भारतरत्न डॉ. एम. एस. सुब्बुलक्ष्मी फेलोशिप’ आणि ‘युवा टॅलेंट पुरस्कार’ मिळाला आहे. दिवाळीच्या पहाटे अभंगसंगीताचा आनंद घेण्याची ही संधी सर्व रसिकांसाठी खुली आहे.

पंडित भीमसेन जोशींचे स्मरण

विराज जोशी यांच्या गायकीतून उलगडणारी स्वरांची समृद्धी व अभंगातील भक्तिभाव सोलापूरकरांना पंडित भीमसेनजींच्या स्वरपरंपरेची आठवण करून देणार आहे. दिवाळी पहाट कार्यक्रमातून शहरवासीयांना अभिजात संगीत, भक्तिरस आणि सुरेल परंपरेचा मंत्रमुग्ध करणारा संगम अनुभवता येणार आहे. ‘मिले सुर मेरा तुम्हारा’… ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’… अशा अजरामर गीतांना पंडितजींनी केवळ गायकीचे वैभव दिले नाही, तर भक्तीचा भाव घराघरांत पोहोचवला.

प्रवेशिकेसाठी आधारकार्डची प्रत आवश्यक

या कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी प्रवेशिका सकाळ कार्यालयात मोफत उपलब्ध आहेत. प्रवेशिका घेताना प्रेक्षकांनी आधारकार्डची प्रत आणणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Books: सरकार बदललं अन् शालेय पाठ्यपुस्तकातील 'हे' शब्दही बदलले; पश्चिम बंगालमध्ये मुघल इतिहासाला कात्री

Israel Politics: बहुमत हुकलं तरी नेतान्याहू 'प्रचंड आशावादी'! थेट विरोधकांशीच आघाडीची तयारी

Ranji Trophy 2026: मुंबईने ६४ चेंडूंत जिंकली मॅच!Tanush Kotian च्या ८ विकेट्स, तर Musheer Khan ची ऐतिहासिक कामगिरी

Latest Marathi News Update: सरपंच मंगेश साबळे यांनी भीमाशंकर येथे होणाऱ्या वृक्षतोडीचा केला विरोध

Meenakshi Shinde Resign: ठाण्यात मोठी घडामोड! प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरण; मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा

SCROLL FOR NEXT