Viral Sach
Viral Sach Sakal
पुणे

‘व्हायरल सच’साठी विद्यार्थ्याने राबविली भन्नाट कल्पना

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोना रुग्णांवर (Corona Patient) उपचार (Treatment) करण्यासाठी कोणत्या रुग्णालयात बेड, ऑक्सिजन उपलब्ध आहेत, याबाबत समाज माध्यमातून अनेक चुकीचे व खोटे मेसेज (Wrong Message) सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे ते तपासण्यात रुग्णांच्या (Patient) नातेवाइकांचा वेळ खर्च होऊन वेळेत मदत मिळण्यात अडचण (Problem) निर्माण होत आहे. या मेसेज मागील सत्य शोधण्यासाठी जोधपूर येथील अठरा वर्षीय विद्यार्थ्याने (Student) भन्नाट कल्पना राबविली आहे. (Viral Sach Student Idea)

यश बोरा असे बारावीत शिकणारे विद्यार्थ्याचे नाव. त्याने रुग्णांना वेळेत ऑक्सिजन, बेड आणि प्लाझ्मा मिळावा यासाठी समाजमाध्यमावरील पडणाऱ्या पोस्टची खात्री करून संबंधित रुग्णांना योग्य माहिती पुरविणारे संकेतस्थळ तयार केले आहे. या कामात यश समवेत पुण्यातील सानवी राहुल नगरे, जोधपूर येथील तन्मय चौधरी तसेच विविध भागातील तरुणांनी सहभाग घेतला आहे. तर या तरुणांना मार्गदर्शन करण्याचे काम अभिलाषा सिंग आणि चिंतन राडिआ करीत आहेत.

या संकेतस्थळाबाबत यश म्हणाला, ‘‘गेल्या वर्षी कोरोनामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. तेव्हा आम्हाला बेड आणि ऑक्सिजनबाबत अनेकदा चुकीची माहिती मिळाली. त्यामुळे आमच्या सोबत जे झाले ते इतरांसोबत होऊ नये म्हणून कोरोना रुग्णांना मदत करण्याचे ठरविले. त्यामुळे आम्ही समाज माध्यमावर पडणाऱ्या पोस्टची खात्री करून उपलब्ध असलेले ऑक्सिजन बेड मिळवून देण्याचे काम करीत आहोत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) निर्देशांमुळे प्लाझ्माची सेवा बंद केली आहे. आम्ही दररोज सुमारे १०० रुग्णांना ऑक्सिजन बेड व इतर सुविधा पुरवीत आहोत.

मी इयत्ता नववीत असून यश दादाच्या उपक्रमाबाबत मला समाजमाध्यमातून समजले. मी सुद्धा त्यात सहभाग घेण्याचे ठरविले. बेडची माहिती गोळा करणे, त्याची खात्री करणे व त्यानंतर गरजू रुग्णांना संबंधित रुग्णालयाशी संपर्क साधून देत आहोत. सध्या पुण्यातून सुमारे १० स्वयंसेवक या कार्यात सहभागी आहेत.

- सानवी राहुल नगरे, पुण्यातील स्वयंसेवक

अशी आहे व्यवस्था...

  • सध्या १०० ते १५० स्वयंसेवक कार्यरत

  • ही सेवा देशपातळीवर राबविण्यात येत आहे

  • व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून माहितीचे आदान-प्रधान

  • एक हजाराहून अधिक रुग्णांच्या नातेवाइकांची मदतीसाठी नोंदणी

  • सध्या फक्त ऑक्सिजन बेड व रुग्णालयाशी संबंधित सेवा पुरविण्यात येते

येथे करा संपर्क...

रुग्णांना ऑक्सिजन बेड व रुग्णालयांमध्ये जागा उपलब्ध आहे की नाही, याबाबत खात्रीशीर माहिती हवी असल्यास त्यांच्या नातेवाइकांनी www.fightagainstcovid.org या संकेतस्थळाचा वापर करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT