विशाखापट्टण, ता. २० : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टण येथे येथील लिटिल गार्डन स्कूलमध्ये बालवाडीत शिकणाऱ्या सहा वर्षांच्या प्रणय तेज या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
गृहपाठ पूर्ण केला नसल्याने शिक्षिकेने मुलाला मारहाण करून दमदाटी केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर घाबरलेला प्रणय रडू लागला. काही वेळाने त्याला खोकला येऊ लागला आणि तो शिक्षिकेच्या अंगावर कोसळून बेशुद्ध झाला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, प्रणयची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, असा कुटुंबीयांचा दावा आहे.
घटनेनंतर पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही चित्रण तपासले असता शिक्षिका प्रणयला दमदाटी करताना दिसत आहे. मात्र, विद्यार्थ्याच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.