पुणे

केवळ ॲप फॉलो केल्याने गुन्हेगार ठरत नाही!

CD

‘बुली बाई ॲप’प्रकरणात
विशाल झा याची मुक्तता

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : ‘बुली बाई ॲप’ प्रकरणातील आरोपी विशाल सुधीरकुमार झा याची वांद्रे न्यायालयाने सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. ॲप तयार करण्यात किंवा ते तयार करण्यासाठी सहआरोपींना मदत केल्याचे कोणतेही थेट पुरावे आरोपपत्रात नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायिक दंडाधिकारी आर. टी. इंगळे यांनी नुकताच हा आदेश दिला. झा यांनी ॲप तयार केले किंवा सहआरोपींना ॲप तयार करण्यास मदत केली, असे दाखवणारा कोणताही ठोस पुरावा आरोपपत्रात नाही. सहआरोपींशी संपर्क किंवा परिचय असणे म्हणजे त्यांच्या गुन्ह्यांसाठी जबाबदार ठरणे नव्हे. केवळ एखादे संकेतस्थळ किंवा पेज फॉलो करणे हा स्वतःमध्ये दंडनीय गुन्हा ठरत नसल्याचेही दंडाधिकाऱ्यांनी निर्दोष मुक्तता करताना स्पष्ट केले. ‘बुली बाई’ ॲपवर शंभरहून अधिक मुस्लिम महिलांची छायाचित्रे त्यांच्या परवानगीशिवाय गैरहेतूने प्रसिद्ध करण्यात आली होती. हे ॲप ‘गिटहब’वर होस्ट केले होते. या प्रकरणात झा यांच्यासह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील ही पहिली अधिकृत निर्दोष मुक्तता ठरली आहे. याआधी १२ एप्रिलला झा यांच्यासह अन्य दोन आरोपींना जामीन मंजूर केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyadhar Anaskar : आरबीआयच्या नव्या पतधोरणामुळे सर्वसामान्यांचे कर्ज महागण्याची शक्यता; समतोल राखण्याचे बँकिंग क्षेत्रासमोर आव्हान

Beed News : बीडच्या एलसीबी पथकाचा सन्मान! अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा लावून ४५ तोळे सोने, १६०० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात धडाकेबाज कामगिरी

Sakal Karandak Competition : पुणे विभागातून ‘लाजाळू’ अंतिम फेरीत; ‘ईमान’ला द्वितीय; ‘नातीगोती’ला तृतीय क्रमांक

Delhi Building Collapse: दिल्लीत भीषण दुर्घटना! चार मजल्यांची इमारत कोसळली, गरोदर मातेसह तिघांचा मृत्यू

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सातव्या दिवशीही कायम

SCROLL FOR NEXT