न्हावरे, ता. ३१ : शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने विश्वकर्मा जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी येथील ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिरात भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कीर्तनकार लक्ष्मण निगडे यांचे विश्वकर्मा यांच्या जीवनावर आधारित प्रवचन झाले. त्यानंतर श्री मल्लिकार्जुन भजनी मंडळाचा कार्यक्रम पार पडला. दुपारी विश्वकर्मा यांच्या प्रतिमेवर फुलांचा वर्षाव करत हरिनामाच्या गजरात आणि टाळ मृदंगाच्या तालावर जयंती उत्सव पार पडला. या कार्यक्रमासाठी न्हावरे तसेच परिसरातील भक्तांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.