पुणे

विस्टाडोमच्या ''काचेच्या खिडकीतून'' मध्य रेल्वेला ८१ कोटींची कमाई

CD

विस्टाडोम कोचचा फोटो वापरा

‘विस्टाडोमच्या खिडकीतून’ मध्य रेल्वेला ८१ कोटींची कमाई
तीन वर्षांत पाच लाखांहून अधिक प्रवाशांची पसंती; लोकप्रियतेत वाढ

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १२ : पर्यटन आणि रेल्वे प्रवासाचा अनोखा संगम ठरलेल्या विस्टाडोम कोचला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मध्य रेल्वेच्या या उपक्रमातून गेल्या तीन वर्षांत पाच लाखांपेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला असून, ८१ कोटी रुपयांचा महसूल मध्य रेल्वेला मिळाला आहे.

मध्य रेल्वेकडून विविध मार्गांवर चालविण्यात येणाऱ्या विस्टाडोम कोचच्या माध्यमातून प्रवाशांना निसर्गरम्य घाटमार्ग, डोंगररांगा, धबधबे आणि विहंगम दृश्यांचा अनुभव घेता येत आहे. त्यामुळे पर्यटनासाठी या कोचला मोठी पसंती मिळत असून, अनेक मार्गांवरील बुकिंग शंभर टक्क्यांहून अधिक होत असल्याचे चित्र आहे.
२०२३-२४ ते २०२५-२६ या तीन वर्षांच्या कालावधीत विस्टाडोम कोचमधून एकूण ५ लाख ३३ हजार प्रवाशांनी प्रवास केला. यासाठी मध्य रेल्वेकडून ११ हजार ८७८ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. या कालावधीत मध्य रेल्वेला एकूण ८१.२९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. वर्षनिहाय आकडेवारीवरून विस्टाडोम कोचची लोकप्रियता सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.
............
वर्ष निहाय उत्तपन्न
वर्ष फेऱ्या प्रवासी उत्पन्न (कोटीत)
२०२३-२४ : ३,९८२ १ लाख ७६ हजार ४०४ २६.५०
२०२४-२५ : ३९९० १लाख ७६ हजार ६०८ २६.८३
२०२५-२६: ३,९६६ १ लाख ८०हजार ४६६ २७.९६
.....................
निसर्ग सौंदर्याचा अनुभव
विस्टाडोम कोचमध्ये मोठ्या काचेच्या खिडक्या, पारदर्शक छप्पर तसेच फिरत्या खुर्च्यांची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवाशांना कोणत्याही दिशेचे दृश्य सहज अनुभवता येते. मुंबई-पुणे डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस तसेच मुंबई-मडगाव मार्गावरील विस्टाडोम कोचला पर्यटकांची विशेष पसंती मिळत आहे.
..........
प्रवाशांच्या पसंतीची मोहोर
प्रिमियम दर्जाच्या सुविधा आणि आरामदायी प्रवासामुळे विस्टाडोम कोचने मध्य रेल्वेच्या उत्पन्नात मोलाचा वाटा उचलला आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता आगामी काळात अशा कोचची संख्या किंवा फेऱ्या वाढविण्याबाबत मध्य रेल्वेकडून सकारात्मक पावले उचलली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रेल्वे पर्यटनाला नवी दिशा देण्यात या उपक्रमाची महत्त्वपूर्ण भूमिका ठरत आहे.
............
कोट PNE26W18514
- मध्यरेल्वेने पर्यटनातून चांगले उत्पन्न मिळविले आहे. अशा प्रकारची मीटरगेज रेल्वे बार्शी ते येडशी दरम्यान विकसित करण्याची सोलापूर विभागाला मोठी संधी आहे. पावसाळ्यात या परिसराला राज्यभरातील पर्यटक पसंती देतील. यासाठी नवीन गुंतवणुकीचीही गरज नाही. जुना रेल्वेमार्ग विकसित करणे आवश्यक आहे.
- शैलेश वखारिया, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी सेल, बार्शी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Import Duty Hike in India : सोनं-चांदीसह मौल्यवान धातू महागणार! मध्यरात्री केंद्र सरकारचा मोठा निर्णय...

Maharashtra Doctor Transfers: राज्यातील ९०० डॉक्टरांच्या बदलीच्या आदेशाने उडाली खळबळ; मूळ पदावर होणार रवानगी, सोयीच्या ठिकाणी वशिल्याने गेलेल्यांना दणका

निदा खानला मदत करणाऱ्या नगरसेवक मतीन पटेलच्या मालमत्तेवर महापालिकेचा बुलडोजर; पत्नी अन् मुलीने फुलं देऊन केलं स्वागत

Shreyas Iyer: गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या चुका पंजाबला महागात; श्रेयस अय्यर संतापला; २१० धावाही अपुऱ्या ठरल्या! दिल्लीकडून पंजाबचा थरारक पराभव

IMD monsoon forecast update अंदमानात मॉन्सूनची चाहूल, चार-पाच दिवसांत आगमन; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

SCROLL FOR NEXT