पुणे

चाकणला दृष्टिदोष दिव्यांग तपासणी शिबिरास प्रतिसाद

CD

चाकण, ता. २३ : पंचायत समिती खेड शिक्षण विभाग, एच. व्ही. देसाई टीम महंमदवाडी हडपसर यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण येथे तालुकास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. दृष्टिदोष, अंध दिव्यांग प्रकारचे १०५ विद्यार्थी शिबिरात सहभागी झाले होते, अशी माहिती नारायण करपे यांनी दिली.
पुणे जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती खेड शिक्षण विभाग उपक्रमांतर्गत तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत वैद्यकीय निदान व उपचार शिबिर चाकण येथे गटशिक्षण अधिकारी अमोल जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले होते. यामध्ये दृष्टिदोष, अंध प्रकारचे दिव्यांगत्व असणाऱ्या १०५ विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी जिल्हा परिषद चाकण क्र. १ या शाळेत करण्यात आली.
तालुकास्तरीय शिबिरास केंद्राच्या केंद्रप्रमुख सुनंदा पाटील, मुख्याध्यापिका हेमलता देशमुख, भास्कर घाडगे, विशेष शिक्षक प्रतिभा भांगे, अब्दुस्सलाम शेख, उज्ज्वला सांडभोर, सुचित्रा घुगे, साधना उभे, दीपाली रासकर, मीनाक्षी काकडे, ज्ञानेश्‍वर अप्पाने, शाळेतील वर्ग शिक्षक नारायण करपे, काळूराम डावरे, हनुमंत कलवडे व एच. व्ही. देसाई हॉस्पिटल टीम प्रमुख शशिकांत भिसे यांनी नियोजन करून शिबिर यशस्वीपणे पार पाडले. उपस्थित दिव्यांग विद्यार्थी व पालकांना खाऊ वाटप करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT