पुणे

वीट हद्दीत पटेल ट्रॅव्हल्स झाडावर आदळली; महिला व लहान मुलींसह अनेक प्रवासी जखमी! पहाटे साडेचारच्या सुमारास अपघात; चालकाला गुंगी आल्याने नियंत्रण सुटल्याची प्रवाशांची माहिती; स्थानिक युवकांकडून तातडीने मदतकार्य

CD

KOR26B11217
वीट (ता. करमाळा) ः झाडावर आदळलेली बस.

पुणे–परंडा ट्रॅव्हल्सचा वीटजवळ अपघात; सात प्रवासी जखमी
पहाटे साडेचारच्या सुमारास अपघात; स्थानिक युवकांकडून तातडीने मदतकार्य

सकाळ वृत्तसेवा
करमाळा, ता. १३ : पुण्याहून परंड्याकडे जाणारी पटेल ट्रॅव्हल्स करमाळा तालुक्यातील वीट हद्दीत गुरुवारी (ता. १२) पहाटे साडेचारच्या सुमारास रस्त्यालगतच्या झाडावर आदळली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती प्रवाशांनी दिली. या दुर्घटनेत तीन महिला, दोन पुरुष आणि दोन मुली असे सात जण जखमी झाले असून, एका महिलेच्या कंबरेला गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

पटेल ट्रॅव्हल्स (एमएच ०१/सीआर ७४००) बुधवारी रात्री अकराच्या सुमारास पुण्याहून परंड्याकडे रवाना झाली होती. गुरुवारी पहाटे वीट हद्दीतून करमाळ्याच्या दिशेने जात असताना चालकाला गुंगी आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स रस्त्यालगतच्या झाडावर आदळली, असे प्रवाशांनी सांगितले.
अपघातात पाच ते सहा वर्षांची एक मुलगी, १२ ते १३ वर्षांची दुसरी मुलगी, तीन महिला आणि दोन पुरुष जखमी झाले. एका महिलेच्या कंबरेला जोरदार मार लागला असून, अन्य प्रवाशांनाही दुखापत झाली आहे.
अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ट्रॅव्हल्समधील जखमी प्रवाशांना बाहेर काढून मदतकार्य केले. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण, जखमींची अधिकृत संख्या आणि त्यांच्या प्रकृतीबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dwayne Johnson Health : 'द रॉक'ला गंभीर आजार झाल्याची चर्चा? २२ किलो वजन घटल्यानंतर व्हायरल दाव्यामागचे खरे सत्य समोर!

Social Media: एका ओळीची पोस्ट अन् थेट PM मोदींचा रिप्लाय; हा नेटकरी आहे तरी कोण?

Sinhgad Institute : अखेर ‘सिंहगड संस्थे’च्या सात महाविद्यालयांवर ‘प्रशासक’; सात महाविद्यालयांचे व्यवस्थापन शासनाच्या ताब्यात

ISC & ICSE Exam : ‘आयएससी’ची परीक्षा ९ फेब्रुवारीपासून, तर आयसीएसईची १५ फेब्रुवारीपासून; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : प्रदीप पुर्णेकर हत्याप्रकरणी बिल्डर जितेंद्र मेहता यांची दीड तास चौकशी

SCROLL FOR NEXT