लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर व मेघा घाडगे यांना पुरस्कार प्रदान करताना आमदार अतुल बेनके. Sakal
पुणे

पुणे : सुरेखा पुणेकर व मेघा घाडगे यांना विठाबाई नारायणगाव जीवन गौरव पुरस्कार

आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला

रवींद्र पाटे

नारायणगाव - मराठी बाणा प्रतिष्ठानच्या वतीने लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर व मेघा घाडगे यांना विठाबाई नारायणगाव जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. येथील ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवी, श्री काळोबा देवस्थान यात्रा उत्सव व मराठी बाणा प्रतिष्ठानचा वर्धापन दिन या निमित्ताने येथील श्री मुक्ताबाई समाज मंदिर सभागृहात पुरस्कार वितरण व लावणी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर व मेघा घाडगे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, युवा नेते सुजित खैरे, सूरज वाजगे, गणेश वाजगे, जयेश कोकणे, मराठी बाणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश मेहेत्रे, संचालक राजेंद्र कोल्हे, अंजली खैरे, ज्योती संते आदी उपस्थित होते.

लावणी महोत्सवात लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर, मेघा घाडगे यांनी सादर केलेल्या कारभारी दमान, या पाटलाचा लई रुबाब बाई लई रुबाब , या रावजी बसा भाऊजी, सांगा ना कशी दिसते मी ,यावं यावं दिलाच्या दिलवरा, नाद एकच एकच फक्त बैलगाडा शर्यत , बाई मी लाडाची कैरी पाडाची, फड सांभाळ ग तुऱ्याला आला तुझ्या उसाला लागल कोल्हा या बहारदार व दिलखेच लावण्यांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.या वेळी आदिशक्ती महिला प्रतिष्ठानच्या वतीने पैठणी भेट देऊन दहा महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन मराठी बाणा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी केले.

माझे आई व वडील हे दोघेही तमाशा कलावंत होते. तमाशा कलावंत म्हणून माझी सुरवात नारायणगाव येथूनच झाली आहे. नारायणगावकर ग्रामस्थांनी तमाशा कलावंत व फडमलकांना नेहमीच आश्रय दिला आहे. आमदार बेनके यांनी कोरोनाकाळात तमाशा कलावंत यांना मदत केली. तमाशा पंढरी म्हणून नावलौकिक असलेल्या नारायणगाव नगरीत राष्ट्रपती पदक विजेत्या विठाबाई नारायणगाव यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना आनंद होत आहे.

- सुरेखा पुणेकर, लावणीसम्राज्ञी.

स्व. विठाबाई नारायणगावकर, स्व. तुकाराम खेडकर, स्व. पांडुरंग मुळे, स्व. चंद्रकांत ढवळपुरीकर आदी जेष्ठ तमाशा कलावंत व फडमालक यांचा नारायणगाव नगरीत उदय झाला.तमाशा कलेच्या माध्यमातून त्यांनी नारायणगावचा नावलौकिक वाढविला. या वर्षी नारायणगावात प्रथमच लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याने पुढील वर्षी सुद्धा लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल.

- रमेश मेहेत्रे, अध्यक्ष, मराठी बाणा प्रतिष्ठान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT