विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती लेपन
प्रक्रियेचा मार्ग मोकळा
----
कोल्हापूर सर्किट बेंचचा मंदिर समितीच्या बाजूने निकाल
----
ॲग्रोवन वृत्तसेवा
पंढरपूर, जि. सोलापूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तींच्या जतन व संवर्धनासाठी (लेपन प्रक्रिया) प्रस्तावित असलेल्या कार्यवाहीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने विठ्ठल मंदिर समितीच्या बाजूने अंतिम निकाल देत, या प्रक्रियेला आव्हान देणारी रिट याचिका फेटाळून लावली आहे.
पंढरपूर मंदिरे अधिनियम, १९७३ मधील कलम ३२ नुसार मंदिराची संपत्ती, देवता व मूर्तींचे संरक्षण आणि योग्य देखभाल करण्याची वैधानिक जबाबदारी मंदिर समितीवरच आहे, असे न्यायालयाने अधोरेखित केले. मंदिर समितीचा निर्णय मनमानी नसून, तो भारतीय पुरातत्व सर्वेक्ष'' विभागाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या अहवालावर आधारित आहे, हे न्यायालयाने मान्य केले. याचिकाकर्त्यांनी पारंपरिक ‘वज्रलेप’ पद्धतीचा आग्रह धरला होता; मात्र त्याबाबत कोणताही ठोस वैज्ञानिक, तांत्रिक किंवा शास्त्रीय पुरावा न्यायालयात सादर करता आला नाही. संवर्धन प्रक्रियेचे स्वरूप व पुढील नियोजन मूर्तींची झीज व नुकसान रोखण्यासाठी आता पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांच्या थेट देखरेखीखाली संवर्धनाचे काम केले जाणार आहे.
संवर्धनापूर्वी मूर्तींच्या सद्यःस्थितीचे तांत्रिक दस्तऐवजीकरण आणि आवश्यक वैज्ञानिक परीक्षणे केली जातील. संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही मूर्तींची नियमित पाहणी केली जाईल, असे सांगण्यात आले.
कोट ----
उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखालीच मूर्ती संवर्धनाची पुढील कार्यवाही केली जाईल. लेपन प्रक्रियेची निश्चित तारीख मंदिर समितीच्या आगामी बैठकीत ठरविण्यात येईल.
- प्रवीणकुमार घम, व्यवस्थापक, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.