पुणे

विठ्ठल रखुमाई उत्सवानिमित्त विठोबाच्या वाड्यात भजन, कीर्तन

CD

पिरंगुट, ता. २ : मुठा खोऱ्यातील आंदगाव (ता. मुळशी) येथील विठ्ठल रखुमाई उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अडीचशे वर्षांची परंपरा असलेल्या या विठ्ठल रखुमाईच्या उत्सवाची नुकतीच सांगता झाली. त्यानिमित्त तीन दिवसीय उत्सवात मुठा व मोसे खोऱ्यातील भाविकांसह तालुक्यातील तसेच पुणे शहरातील वारकरी व भाविक भजन व कीर्तनात रमून गेले होते. या तीन दिवसांत रोज हरिपाठ, प्रवचन, भजन तसेच कीर्तन आदी कार्यक्रम पार पडले. येथील गावातील वाड्यात विठोबाचे उभारलेले मंदिर हे मुठा खोऱ्यातील पहिले मंदिर असल्याने येथील वाड्यालाही विठोबाचा वाडा असे नाव पडले.
कृष्णा महाराज पडवळ व हनुमंत शेलार यांची कीर्तने झाली. अमोल नवस्कर यांचे प्रवचन झाले. नवनाथ नवस्कर व रोहिदास उभे यांचा हरिपाठाचा कार्यक्रम झाला. यावेळी टाळ मृदंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या जयघोषात दिंडी काढण्यात आली होती. दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी स्थानिक तरूणांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी शरद ढमाले, शांताराम इंगवले, महादेव कोंढरे, आबासाहेब शेळके, राजेंद्र दबडे, दगडूकाका करंजावणे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपची राज्यसभेची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातून रामदास आठवले, विनोद तावडेंसह चौघांना संधी

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

भाजप महाराष्ट्रातून राज्यसभेवर देणार महिला उमेदवार, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंच्या निकटवर्तीय; तातडीनं बोलावलं मुंबईला

रक्तातील कावीळ कशी होते? कोणत्या अवयवावर ताण येतो? 'या' 6 लक्षणांकडे दुर्लक्ष म्हणजे मृत्यूला आमंत्रण!

BEST Bus Accident: भांडुप बस अपघात प्रकरणी धक्कादायक खुलासा, चालकाने प्रशिक्षणच पूर्ण केलं नाही; ७०४ पानी आरोपपत्र

SCROLL FOR NEXT