Ashadhi Wari 2024 sakal
पुणे

Ashadhi Wari 2024 : कॅलिफोर्नियातील वारीत विठुरायाचा जयघोष

परदेशातील भारतीयांनी घेतला प्रतिकात्मक वारीचा अलौकिक आनंद... पंढरीच्या वारीच्या माध्यमातून संतांबद्दलची भक्तिप्रेमाची भावना महाराष्ट्रासह अन्य राज्यातही दिसते. त्याचबरोबर कर्मभूमी म्हणून परदेशी वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील भक्तांना पंढरीच्या वारीचा लळा लागला आहे. कॅलिफोर्नियात राहणारे भारतीय माउलीभक्त ‘विठोबा वारी’च्या निमित्ताने एकत्र येऊन पंढरीच्या प्रतिकात्मक वारीचा अलौकिक आनंद अनुभवत आहेत.

शंकर टेमघरे -सकाळ वृत्तसेवा

जेजुरी : पंढरीच्या वारीच्या माध्यमातून संतांबद्दलची भक्तिप्रेमाची भावना महाराष्ट्रासह अन्य राज्यातही दिसते. त्याचबरोबर कर्मभूमी म्हणून परदेशी वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील भक्तांना पंढरीच्या वारीचा लळा लागला आहे. कॅलिफोर्नियात राहणारे भारतीय माउलीभक्त ‘विठोबा वारी’च्या निमित्ताने एकत्र येऊन पंढरीच्या प्रतिकात्मक वारीचा अलौकिक आनंद अनुभवत आहेत.

सकल संतांच्या पादुका पंढरीची वाट चालत आहेत. देहू- आळंदीतून पालख्या निघाल्या की अनेक देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे, सोशल मीडियाच्या माध्यमातून वारीचे क्षण टिपले जातात. इच्छा असूनही वारीला जाता येत नसलेल्या माउलीभक्तांची मांदियाळी अनेक देशांत एकवटू लागली आहे. वारीचे प्रतीक म्हणून विठुरायाचा, संतांचा जयघोष करीत प्रतिकात्मक वारी काढून पालखी सोहळ्याचा आनंद घेत असतात. त्याचाच एक भाग म्हणजे कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्कोच्या भूमीवर महाराष्ट्र मंडळ बे एरियामध्ये (एमएमबीए) काढलेली ‘विठोबा वारी’ होय.

आम्ही उद्योग-व्यावसायासाठी कॅलिफोर्नियामध्ये आहोत. विठोबा वारीचे गेल्या दोन वर्षांपासून आयोजन करण्यात येत आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यानिमित्ताने हरिनामाचा गजर होतो. सर्व भारतीय त्यानिमित्ताने एकत्र येतात आणि अध्यात्माचा अलौकिक आनंद घेतात.

- वीणा उत्तरवार, सह संयोजक, विठोबा वारी, कॅलिफोर्निया

अशी असते ‘विठोबा वारी’

आषाढी वारीच्या महिनाभर आधी येणाऱ्या तीन शनिवार व रविवारी ‘विठोबा वारी’चे आयोजन केले जाते. रिव्हर व्हू पार्क, नॉर्थ फस्ट स्ट्रीटपासून ते बालाजी विठोबा मंदिरापर्यंत वारी निघते. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ जयघोष करत, अभंग गात वारकरी सकाळी सहा ते अकराया वेळेत विठोबा मंदिराच्या दिशेने चालतात. दररोज ११ किलोमीटर चालत वारीत सहभागी होतात. यातील काही भाविकांना प्रत्यक्ष वारीचा अनुभव असल्याने ते पंढरीचा वाटचालीतील आठवणींना उजाळा देतात. आषाढीला वारी पूर्ण केली जाते. त्यावेळी पालखी काढण्यात येते. कीर्तन होते. हरिनामाच्या गजरात रिंगण होते. पूजा, आरती केली जाते. फराळाचे वाटप होते आणि वारीचा आनंद घेतला जातो. गेल्यावर्षी मोहन उत्तरवार यांच्या नेतृत्वाखाली सोळा माउलीभक्त कॅलिफोर्नियामधून प्रत्यक्ष पंढरीच्या वारीत सहभागी झाले होते. कॅलिफोर्नियामधील विठोबा वारीत ‘एमएमबीए’चे अध्यक्ष भास्कर रानडे, सह संयोजक वीणा उत्तरवार यांचा नियोजनात सहभाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Verdict: सेक्सनंतर जन्मकुंडलीचा बहाणा करून लग्न नाकारणे हा गुन्हा; दिल्ली उच्च न्यायालयाचा स्पष्ट निकाल

IPO Market: रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील दिग्गज कंपनीचा ₹31,000 कोटींचा IPO बाजारात! गुंतवणूक करण्याआधी वाचा डिटेल्स

Video : राजवाडेंमुळे आनंद उचलणार टोकाचं पाऊल ? प्रोमो पाहून प्रेक्षक अस्वस्थ "हा समर डोक्यावर पडलाय"

RTE Reimbursement: आरटीई अनुदान रखडल्याने शाळांची कोंडी; पाच वर्षांपासून ९५ कोटी थकीत, न्यायालयीन आदेशाची पायमल्ली?

'आतल्या आत घुसमटत...' नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटाबद्दल पहिल्यांच बोलली समांथा, म्हणाली...'माझा डिव्होर्स झाला, तेव्हा…'

SCROLL FOR NEXT