vitthal devotees prayed from home coronavirus 
पुणे

ना मंदीरात दर्शन, ना प्रसाद वाटप; घरात घुमला ''विठ्ठल विठ्ठल''चा जयघोष

सकाळवृत्तसेवा

पुणे : "आषाढी एकादशी म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनाला जाणे आलेच, पुण्यातील मंदिर गजबजून जायची. यंदा मात्र कोरोना मुळे मंदिरांनाच टाळे लागले आहे. शाळा बंद असल्याने बाळगोपाळ पांडूरंग, वारकऱ्यांच्या वेशात शाळेत जाऊ शकले नाहीत. म्हणून काय एकादशीला उत्साह काष कमी झाला नाही. घरातच रामकृष्ण हरी... बोला ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय... विठ्ठल विठ्ठल... असा सहकुटुंब जयघोषात आषाढी एकादशीला उपासना करण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

'कोरोना'मुळे यंदाची आषाढी वारी सोहळा रद्द झाला. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज यांच्या पादुका मोजक्या वारकर्यांच्या उपस्थितीत पंढरपूरला बसने दाखल झाल्या. लाखो भाविकांची गर्दी पहाणारे पंढरपूर आज मात्र सुनेसुने आहे. याचाच प्रचिती पुण्यात देखील आली. 

बारामतीत कोरोनाची पुन्हा एन्ट्री


पुण्यात विठ्ठलवाडी येथील पांडुरंगाच्या मंदीरात आषाढी एकादशीला पहाटे पासून भाविक दर्शनासाठी रांगा लावतात,सामजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष भाविकांचे उत्साहाने स्वागत करतात. मात्र यंदा विठ्ठल मंदिर परिसर भाविकांसाठी बंद करण्यात आला होता. देवळाला आकर्षण लायटिंग तेवढी करण्यात आली होती. शहरातील इतर मंदिरांमध्येही हीच स्थिती होती. 

सावधान, कोरोनाविषयी मॅसेज फाॅरवर्ड करण्यापूर्वी हे वाचा... 

यंदा बाहेर कुठेच जायचे नसल्याने घरोघरी विठ्ठलाचा गजर झाला. देवाची पूजा करून, पांडुरंग, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांची आरती केली. तसेच घरात काहींनी अभंग गावून देवाचे स्मरण केले. दरवर्षी आषाढी एकादशीला शाळांमध्ये लहान मुल विठ्ठल रुक्मिणी, वारकरी, तुळसवाली, विविध संतांचे पेहराव करून शाळेत जात. हा सोहळा ही उत्साहाने साजरा केला जातो, पण यंदा या बाल वारकर्यांनी घरातच एकादशी साजरी केली. काही शाळांनी मुलांना वारकरी वेषात फोटो काढून शाळेच्या ग्रुपवर पाठवायला लावले, तर काहींनी थेट व्हिडिओ पाठवले. घरात साबुदाणा खिचडी, वडे, पापड, फळे, भगर अशी उपवासाच्या पदार्थांचाही अस्वाद घेतला. 

कोरोना झाला आमदारांना...ग्रामस्थांचा जीव टांगणीला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Asia Games 2026: भारताच्या पोरींनी पाकिस्तानला ठेचले; इंडोनेशियाविरुद्ध १७-१ अशा विजयाने हॉकीचे मैदान गाजवले

Parbhani Drought-Like Situation : पाणी, चारा, पीक पस्थितीचा आढावा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे प्रशासनास सतर्कतेचे निर्देश

रागात पाहिल्याने छातीवर सपासप वार..., मुंबईत गणेशोत्सवात रक्तरंजित थरार; 7 जणांकडून मंडळाच्या अध्यक्षाची हत्या

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT