Vitthal Rukmini Mandir CEO sakal
पुणे

Vitthal Rukmini Mandir : विठ्ठल रुक्मीणी मंदिर समितीच्या सीईओ पदी धामणीच्या राजेंद्र शेळके यांची निवड

पोलीस उपनिरीक्षक पदी कार्यरत असतानाही त्यांनी स्पर्धा तयारी सुरूच ठेवली होती.

सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

Vitthal Rukmini Mandir - धामणी ता. आंबेगाव येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील राजेंद्र गणपत शेळके यांची श्रीक्षेत्र पंढरपुर येथील श्री. विठ्ठल रुक्मीणी मंदिर समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदी नियुक्ती झाली आहे.

राजेंद्र शेळके यांची सुरवातीला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली होती. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या प्रशिक्षण काळात स्वोर्ड ऑफ ऑनर, स्वोर्ड ऑफ बॅटन, बेस्ट स्टुडंट, ऑल राऊंड स्टुडंट, हि बक्षिसे मिळवत त्यांनी अव्वल क्रमांक पटकाविला होता.

प्रशिक्षण काळात शेवटच्या पंधरा दिवसात त्यांना परेड कामांडर म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मानाची तलवार देऊन गौरव झाला होता.

पोलीस उपनिरीक्षक पदी कार्यरत असतानाही त्यांनी स्पर्धा तयारी सुरूच ठेवली होती नंतर त्यांची तहसीलदार पदी निवड झाली बार्शी, कराड, तासगाव, सोलापूर, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी तहसीलदार म्हणून काम पाहिल्यानंतर त्यांची धर्माबाद (नांदेड) येथे प्रांतअधिकारी म्हणून निवड झाली आता त्यांची श्रीक्षेत्र पंढरपुर येथील श्री. रुक्मीणी मंदिर समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदी नियुक्ती झाली आहे.

आज सोमवारी त्यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या निवडीने आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी- धामणी परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, धामणीचे माजी सरपंच सागर जाधव,

खडकवाडीचे माजी सरपंच अनिल डोके व ग्रामपंचायत सदस्य अक्षय विधाटे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. संपूर्ण राज्याचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपुर येथील श्री.विठ्ठल रुक्मीणी मंदिर येथे आषाढी एकादशीच्या तोंडावर माझी नियुक्ती होऊन काम करण्याची संधी मिळाल्याने हे मी माझे भाग्य समजतो अशी प्रतिक्रिया राजेंद्र शेळके यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT