Vivek Debrai sakal
पुणे

डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाच्या कुलपतीपदी विवेक देबराय

डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्थेच्या (अभिमत विद्यापीठ) कुलपतीपदी प्रख्यात अर्थतज्ज्ञ विवेक देबरॉय यांची नियुक्ती झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्थेच्या (अभिमत विद्यापीठ) कुलपतीपदी प्रख्यात अर्थतज्ज्ञ विवेक देबरॉय यांची नियुक्ती झाली आहे.

पुणे - डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्थेच्या (अभिमत विद्यापीठ) कुलपतीपदी प्रख्यात अर्थतज्ज्ञ विवेक देबरॉय यांची नियुक्ती झाली आहे. विद्यमान कुलपती डॉ. ए. पी. जामखेडकर यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने पुढील पाच वर्षांसाठी देबरॉय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

देबरॉय सध्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत. जानेवारी २०१५ ते जून २०१९, या काळात ते निती आयोगाचे सदस्य म्हणून कार्यरत होते. केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे सल्लागार, रेल्वे मंत्रालयाने भारतीय रेल्वेची पुनर्रचना करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष, राजीव गांधी इन्स्टिट्यूट फॉर कंटेम्पररी स्टडीजचे संचालक, झारखंडच्या विकास योजनेची शिफारस करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष, राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य आदी पदांवर त्यांनी काम केले आहे.

अर्थशास्त्रासह संख्याशास्त्रीय व गणिताधारित विश्लेषण पद्धती यांमध्ये देबराय यांचे विशेष प्रावीण्य आहे. तसेच, प्राचीन संस्कृत वाङ्मयातही त्यांना विशेष रस आहे. महाभारत, रामायण, हरिवंश, भगवद्गीता, भागवत पुराण, मार्कंडेय पुराण, ब्रह्म पुराण, विष्णु पुराण आदींचा अनुवाद त्यांनी केला आहे. त्यांची अनेक पुस्तके आणि शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. तसेच, विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी स्तंभलेखन केले आहे. देबराय यांनी प्रेसिडेन्सी कॉलेज, कलकत्ता, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड आणि नॅशनल काऊन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च येथे अध्यापन केले आहे. २०१५ मध्ये त्यांना भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonvi Bridge Accident in Sangameshwar : सोनवी पुलावर दोन ट्रकची धडक; एकाच मार्गिकेतून दुहेरी वाहतुकीचा फटका; महामार्गावर वाहनांच्या रांगा

Pune Rain Update : पुण्यात रात्रभर पावसाची संततधार, अनेक भागांत साचले पाणी; वाहतूक कोंडीने पुणेकर त्रस्त, वाहनांच्या लागल्या रांगा

Latest Marathi News Live Update : आरे कॉलनी परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Mumbai Rain Update: इस्ट टू वेस्ट! वाहतूक कोंडीने मुंबईकर त्रस्त; रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Tukaram Mundhe Crackdown : मुंढेंच्या दणक्याने हॉटेल्सही 'सरळ'! आधी सिलिंडर, आता 'एफडीए'मुळे मेन्यूमध्ये कपात; पनीर, चीज, खवा 'गायब'च

SCROLL FOR NEXT